ठाणे : रुग्णांच्या नातेवाईंकाना बेड मिळविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे, ऑक्सीजनचा तुटवडा, रेमडेसिवरचा तुटवडा आदींमुळे रुग्ण हैराण झाले आहेत. त्यामुळे रुग्णांना ऑक्सीजन आणि रेमडीसीवीरचा पुरवठा सुरळीत करण्यात यावा या मागणीसाठी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने ठाणे महापालिका मुख्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले. यावेळी ऑक्सीजनच्या बाटल्याच पदाधिकाऱ्यांनी मुख्यालयाच्या दरवाजाबाहेर ठेवल्या होत्या. या आंदोलनात गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी देखील आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. तब्बल दोन तास हे आंदोलन सुरु असल्याचे दिसून आले. ठाणे महापालिका हद्दीत रोजच्या रोज कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. परंतु या रुग्णांना बेड मिळत नाही, ऑक्सीजनची कमतरता जाणवत आहे, पार्कीग प्लाझा येथील कोवीड सेंटरला देखील ऑक्सीजनचा साठा अद्यापही उपलब्ध होऊ शकलेला नाही. रेमडेसिवरचा तुटवडा जाणवत आहे. यामुळे रुग्णांबरोबर रुग्णांच्या नातेवाईकांचे देखील हाल होत आहेत. त्यामुळे रुग्णांना ऑक्सीजन सह रेमडेसिवरचा साठा उपलब्ध व्हावा या मागणीसाठी मंगळवारी राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋुता आव्हाड यांच्या पत्नीने महापालिका मुख्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करण्याची वेळ आल्याचे दिसून आले. या आंदोलनात विरोधी पक्षनेते अशरफ शाणु पठाण यांच्यासह राष्ट्रवादीचे नगरसेवक सुहास देसाई यांच्यासह मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी ठाणे महापालिका मुख्यालयातच ठिय्या आंदोलन केले. हे आंदोलन मागे घ्यावे यासाठी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी ऋुता आव्हाड यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु पालिका अधिकाऱ्यांवर त्या चांगल्याच संतापल्याचे दिसून आले.
प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळेच ठाणेकरांवर ही वेळ आली असल्याचे आरोप यावेळी आंदोलनकत्र्यानी केला. जोपर्यंत आयुक्त स्वत: येऊन यासंदर्भात काही माहिती देत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. ठाणो महापालिकेचे उपयुक्त संदीप माळवी यांनी आंदोलन सोडवण्यासाठी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला मात्न ऋुता आव्हाड आणि शानू पठाण हे आंदोलनच्या भूमिकेवर ठाम राहिले.
ऑक्सिजन आणि रेमडेसिवरचा पुरवठा करण्याची जबाबदारी राज्य शासनाची असून महाविकास आघाडीतच गृहनिर्माण मंत्री असलेल्या जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नीलाच अशा प्रकारे प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करण्याची वेळ आली आहे. गृहनिर्माण मंत्र्यांची पत्नी असले तरी मी अनेक सामाजिक संस्थाशी जोडले गेले असून सामान्य जनतेशी आंदोलन करणो माझे कर्तव्य असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
मनसेने घेतली आयुकांची भेट या आंदोलनात सहभागी झालेले मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी पालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांची भेट घेतली. शहरात निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत त्यांनी आयुक्तांचे लक्ष वेधले. तर मुख्यालयाखाली ऋुता आव्हाड आणि शानू पठाण यांचे आंदोलन सुरूच होते.
मनसे असेल तर सहभागी होणार नाहीया आंदोलनच्या दरम्यान राष्ट्रवादीचे गटनेते नजीब मुल्ला हे त्या ठिकाणी आले. स्वत: ऋता आव्हाड हे आंदोलनाला बसल्या असताना मुल्ला हे त्या ठिकाणी थांबतील अशी अपेक्षा होती. मात्र, मनसेचे अविनाश जाधव हे आंदोलनात असल्याने मनसे असेल तर आंदोलनात सहभागी होणार नाही असे स्पष्ट करत ते थेट तिथून निघून गेले.