ठाणे : ठाण्यातील आसरा फाउंडेशन (समूह) द्वारे मागील ४ वर्षांपासून रक्षाबंधन सोहळा कळवा येतील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, ठाणे येथील सिव्हिल हॉस्पिटल तसेच नवी मुंबई येथील राजमाता जिजाऊ रुग्णालय येथील रुग्णांसोबत साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने आज सकाळी दादाजी कोंडदेव स्टेडियम येथील घनकचरा विभाग व ठाणे स्थानक येथील बस स्थानक येथे हा रक्षाबंधन कार्यक्रम झाला.
कोरोना महामारीमुळे सध्याची परिस्थिती पाहता या वर्षी रक्षाबंधन सोहळा रुग्णालयात करणे शक्य झाले नाही. परंतु, या वर्षी हा सोहळा कोरोनाच्या महामारीत जे कोरोना योद्धा (सफाई कर्मचारी व परिवहन सेवेतील कर्मचारी) आहेत. जे देशसेवेत आपले योगदान देत आहेत त्यांच्या सोबत ठाण्यात साजरा करण्यात आला.