शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ता येताच प्रत्येक जिल्ह्यात शिवरायांचं मंदिर बांधणार; दसरा मेळाव्यातून उद्धव ठाकरेंची घोषणा
2
"आज इतकी वर्षे झाली, पण...", उद्धव ठाकरे दसरा मेळाव्यात आरक्षण वादावर काय बोलले?
3
"होती दाढी म्हणून उद्ध्वस्त केली महाविकास आघाडी’’, शिंदेंचा विरोधकांना आठवलेस्टाईल टोला
4
रेकॉर्ड तोडफोड मॅच! ३०० पारची संधी हुकली, पण २९७ धावांसह टीम इंडियानं नोंदवले अनेक विक्रम
5
"मी बाळासाहेबांचा शिवसैनिक, आनंद दिघेंचा चेला, मी मैदानातून पळणारा नाही तर...’’, एकनाथ शिंदेंचा इशारा
6
"मंत्रालय हागणदारी मुक्त करायचंय"; संजय राऊतांचा महायुतीच्या कारभारावर घणाघात
7
Sanju Samson बन गया 'सेंच्युरी' मॅन! षटकार-चौकारांची केली 'बरसात'
8
"मनोज जरांगेंनी वेळीच सरकारला ओळखलं अन्..."; भास्कर जाधवांनी महायुतीला घेरलं
9
IND vs BAN : संजू-सूर्याची जोडी जमली; पॉवर प्लेमध्ये टीम इंडियानं सेट केला नवा रेकॉर्ड
10
त्या २० जागांवर निकाल बदलणार, हरयाणात बाजी पलटणार? काँग्रेसची पुन्हा निवडणूक आयोगाकडे धाव  
11
"भाजपा हा दहशतवाद्यांचा पक्ष"; मल्लिकार्जून खरगेंचा PM मोदींवर पलटवार
12
Masaba Gupta Satyadeep Misra welcomes Baby Girl: मसाबा गुप्ता-सत्यजीत मिश्राला 'कन्यारत्न'; सोशल मीडियावरून शेअर केली 'गोड बातमी'
13
मनोज जरांगे विधानसभा लढवणार? दसरा मेळाव्यातील 'त्या' विधानाची चर्चा
14
डोक्यावर पदर समोर पिस्तूल आणि तलवार; रवींद्र जडेजाच्या आमदार पत्नीकडून शस्त्र पूजन
15
"जगाच्या इतिहासात मला नाही वाटत एखादी संघटना..."; राज ठाकरेंची RSS बद्दल खास पोस्ट
16
Ajay Jadeja Net worth, Virat Kohli: एका दिवसात मालामाल... अजय जाडेजाने संपत्तीच्या बाबतीत विराट कोहलीलाही टाकलं मागे!
17
"गरज पडल्यास हत्यारांचा पूर्ण क्षमतेने वापर होणार, शस्त्रपूजा हे त्याचे संकेत’’, राजनाथ सिंह यांचा इशारा
18
Chris Gayle, LLC 2024 Video: ख्रिस गेल शो! मैदानात तुफान कल्ला, गोलंदाजांची केली धुलाई, फॅन्सचा प्रचंड जल्लोष
19
रोमँटिक झाली हसीन जहाँ; कमेंट आली... "आता शमी भाऊ भेटत नसतो जा!"
20
"मला चारही बाजूंनी घेरलंय, मी तुमच्यात असो वा नसो…’’, सनसनाटी दावा करत जरांगे पाटलांचं भावूक आवाहन

ठाणेकरांनो, महापालिकेवर भरवसा नाय का?; पैसे देऊन उपचार घेण्याकडे कोरोनाबाधितांचा कल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2021 1:15 AM

दोन रुग्णालयांमधील बेड फुल्ल, खाजगी रुग्णालये दिवसाला ४,५०० पासून ते १० हजार रुपये भाडे आकारत आहेत. असे असतानाही ते देण्याची तयारीही रुग्णांची दिसत आहे.

अजित मांडकेठाणे : ठामपा हद्दीत सध्या कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढू लागले असून, खाजगी रुग्णालयांत भरती होता यावे, यासाठी कोरोनाबाधितांचा हट्ट सुरू झाला आहे. त्यामुळे या रुग्णालयांतील बेड सध्या भरलेले आहेत. तर, मनपाच्या कोविड सेंटरमध्ये आजही बेड काही प्रमाणात रिक्त आहेत. २,६२९ बेडपैकी १,१२७ रिकामे  असल्याची माहिती पालिकेने दिली आहे. यामध्ये आयसीयू, व्हेंटिलेटरचे बेडही काही प्रमाणात आजही शिल्लक आहेत. परंतु, असे असताना पैसे मोजून खाजगी रुग्णालयांत उपचार करून घेण्याकडे कल काही प्रमाणात वाढल्याचे दिसून येत आहे. 

ठामपा हद्दीत कोरोना रुग्णवाढीचा दर हा अचानकपणे १५ टक्क्यांवर गेला आहे. सध्या ५,०१८ जणांवर प्रत्यक्ष उपचार सुरू आहेत. यातील ५० टक्के रुग्ण हे घरी उपचार घेत आहेत. आतापर्यंत मनपा हद्दीत ७० हजार २१७ रुग्ण आढळले असून, त्यातील ६३ हजार २८७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर, १,४३० रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. मनपा हद्दीत २,६२९ बेड असून त्यातील १,५०२ बेड फुल्ल, तर १,१२७ बेड रिकामे आहेत. परंतु, असे असले तरी पैसे देऊन बेड मिळविण्यासाठी कोरोनाबाधितांचा अधिक कल असल्याचे दिसत आहे. महापालिकेने सध्या १५ खाजगी रुग्णालये भाड्याने घेतली आहेत. त्यातील केवळ दोन रुग्णालयांत बेड मिळविण्याकडे  रुग्णांचा अधिक कल आहे. त्यामुळे या दोन्ही रुग्णालयांत सध्या बेड शिल्लक नाहीत. त्यातही शासकीय रुग्णालयांत योग्य प्रमाणात उपचार मिळतील की नाही, याबाबतही नागरिक साशंक असल्याने त्यांचा खाजगी रुग्णालयांकडे कल असल्याचे दिसत आहे. 

त्यातही, खाजगी रुग्णालये दिवसाला ४,५०० पासून ते १० हजार रुपये भाडे आकारत आहेत. असे असतानाही ते देण्याची तयारीही रुग्णांची दिसत आहे. काही जण तर चांगले उपचार मिळावेत म्हणून मेडिक्लेमची पॉलिसी काढल्याचे सांगत असून खाजगी रुग्णालयांतच उपचार घेण्यासाठी हट्ट धरत आहेत. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून ठाणे शहरात कोरोनाचे रूग्ण वाढत असल्याने पालिका आणि जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे. अशा परिस्थितीत पुन्हा लाॅकडाऊन लागणार का अशी चर्चा सुरु आहे.

राखीव खाटा नावालाचशहरातील १५ खाजगी रुग्णालयांत सध्या ९५४ बेड असून त्यातील २५४ बेड फुल्ल असून ७०० बेड शिल्लक असल्याची माहिती पालिकेने दिली आहे. परंतु, शहरातील दोनच खाजगी रुग्णालयांना रुग्णांची पसंती असल्याने उर्वरित १३ रुग्णालयांतील बेड काही प्रमाणात रिकामे असल्याचे दिसून आले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका