शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एकाच वाक्यात सांगितलं
3
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
4
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
5
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
6
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
7
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
8
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
9
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
10
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
11
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
13
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
15
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
16
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
17
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम, धनलाभ-पदोन्नती योग; सुख-समृद्धी, शुभ लाभदायी काळ!
18
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
19
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश; आरोपींना आर्थिक मदत करणारा सापडला अन्...
20
काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका

ठाण्यात वाडीया रुग्णालयात सुरु होणार कोरोनाचे मोफत चाचणी केंद्र सर्वसामान्यांना मिळणार मोफत चाचणीची सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2020 5:20 PM

ठाण्यासह आसपास नागरीकांना आता ठाण्यातच कोरोनाची मोफत चाचणीची सुविधा महापालिकेच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. येत्या दोन ते तीन दिवसात ठाण्यातील वाडीया रुग्णालयात ही सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

ठाणे : कोरोनाचा प्रार्दुभाव ठाण्यात दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे. शहरात १०० हून अधिक कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. परंतु ठाण्यात रुग्णांचे किंवा संशयितांचे अहवाल येण्यास पाच ते १२ दिवसांचा कालावधी जात होता. शासकीय यंत्रणांकडून घेतलेले स्वॅब मुंबईला पाठविले जात होते. तर शहरात खाजगी लॅबच्या माध्यमातून चाचणीसाठी ४५०० रुपये आकारले जात होते. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी हा खर्च परवडणारा नसल्याचे वृत्त लोकमतमध्ये प्रसिध्द झाले होते. अखेर या वृत्ताची दखल घेत पालिका प्रशासनाने वाडीया रुग्णालयात ही टेस्टींग लॅब सुरु करण्याचे निश्चित केले आहे. येत्या दोन ते तीन दिवसात ही सुविधा सुरु होणार आहे.                   ठाण्यात आजच्या घडीला १०० हून अधिक रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. शेकडो जणांना सध्या क्वॉरन्टाइन करुन ठेवण्यात आले आहे. यातील अनेकांच्या चाचण्या पालिका किंवा जिल्हा यंत्रणांकडून करण्यात आल्या आहेत. परंतु अनेकांच्या चाचणी अहवाल अद्यापही प्राप्त झालेला नाही. दुसरीकडे अनेकांना होम क्वॉरन्टाइन करण्यात आले असून त्यांच्याची चाचण्या घेण्यात आल्या आहेत. परंतु अहवाल येण्यास विलंब होत असल्याची माहिती जिल्हा रुग्णालय आणि पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे. सध्या शहरात कोरोना बाधीतांची संख्या वाढत असल्याने अनेकांनी भितीपोटीही कोरोनाची चाचणी करुन घेण्यासाठी मागणी केली असल्याची माहिती पालिकेने दिली. दुसरीकडे शहरात दोन खाजगी लॅबला परवानगी देण्यात आली आहे. परंतु एका चाचणीसाठी ४५०० रुपये आकारले जात आहेत. त्यात पहिली टेस्ट निगेटीव्ह आली तर दुसरी टेस्ट करण्यासाठी सर्वसामान्यांकडे पैसे असतीलच असे नाही. त्यामुळे ही देखील एक समस्या पुढे आली आहे. त्यामुळे ठाण्यात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या डोळ्यासमोर ठेवून येथे शासकीय यंत्रणेची स्वतंत्र लॅब असावी अशी मागणी केली जात आहे. जेणे करुन सर्वसामान्यांना त्याचा लाभ होऊ या आजारावर मात करण्यासही मदत होईल असे मानले जात आहे. या संदर्भातील वृत्त लोकमतमध्ये प्रसिध्द झाले होते. तसेच अनेकांनी ही सेवा सुरु करण्यासाठी पालिकेकडे पत्रव्यवहारही केला होता. त्यानंतर आता पालिकेच्या माध्यमातून वाडीया रुग्णालयात ही सेवा उपलब्ध करुन दिली जाणार असल्याची माहिती उपायुक्त संदीप माळवी यांनी दिली. यासाठी आवश्यक असणारी पीसीआर मशीनही उपलब्ध झाले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यानुसार आता ही सेवा येत्या दोन ते तीन दिवसात सुरु केली जाणार आहे. ही सेवा पूर्णपणे मोफत असणार आहे. त्यामुळे याचा फायदा आता सर्वसामान्यांना अधिक प्रमाणात होऊन याचे रिपोर्टही २४ तासाच्या आत देण्यासाठी प्रशासन कटीबध्द असणार आहे. एकूणच यामुळे आता सर्वसामान्य नागरीकांना आता या सेवेचा लाभ घेता येणार आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या