शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
6
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
7
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
8
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
9
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
10
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
11
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
12
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
13
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
14
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
15
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
16
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
17
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
18
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
19
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
20
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल

नागरिकांच्या चुकांमुळे वाढला वागळेत कोरोनाचा संसर्ग

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 2:28 AM

तीन ते चार दिवसांत कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या ही थेट २९ वर गेल्याने संपर्ण वागळे इस्टेट प्रभाग समिती ३ मे पर्यंत पूर्णपणे बंद केली आहे.

ठाणे : अत्यावश्यक कामांसाठी बाहेर पडत आहात, समाजसेवेच्या माध्यमातून गोरगरिबांना मदत करीत आहात, भाजीपाला आणण्यासाठी बाहेर पडत आहात, तर मग यापुढे काळजी घ्या. नाहीतर बाहेरून येताना तुम्ही घरात कोरोना आणत आहात, हे विसरू नका. कारण याच सवयींमुळे वागळे प्रभाग समितीत तीन ते चार दिवसांत कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या ही थेट २९ वर गेल्याने संपर्ण वागळे इस्टेट प्रभाग समिती ३ मे पर्यंत पूर्णपणे बंद केली आहे. येथील नागरिकांना आता अत्यावश्यक सेवांसाठीही बाहेर पडता येणार नसल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे इतरांच्या संपर्कात आल्याने येथील नागरिकांना कोरोनाची बाधा झाली असल्याचे महापालिकेने सांगितले आहे. या चुकांमुळे सीपी तलाव, किसनगर २,३ आणि भटवाडी आणि पडवळनगर, शिवाजीनगर व महाराष्टÑ नगर हे तीन स्पॉट आता हायरिस्कमध्ये आले आहेत.पहिल्या हायरिस्क स्पॉटमध्ये ९ रुग्ण आहेत. सीपी तलाव परिसरात एका समाजसेवकामार्फत अन्नधान्य पुरवठा करण्यात येत होता. त्याच्या घरातीलच सहा लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्याच्या हायरिस्कमध्ये असलेल्या अन्य दोघांनाही लागण झाली आहे. कळवा रुग्णालयात लेबर वॉर्डमध्ये काम करणाऱ्या वैद्यकीय कर्मचारी महिलेचाही यात समावेश आहे. येथील एक गरोदर महिला तपासणीसाठी मुलुंडला जात होती. तिलादेखील आता कोरोनाची लागण झाली आहे, तिला उपचारार्थ दाखल केले आहे.दुसºया हायरिस्क स्पॉटमध्ये किसनगर २, ३ आणि भटवाडी हा परिसर आहे. या परिसरात ११ रुग्ण आढळून आले आहेत. येथे एका पोलिसाला लागण झाली, तर अन्य पती, पत्नी यांनाही कोरोनाची लागण झाली, तर अन्य एका कुटुंबातील दोघींनाही लागण झाली आहे. तर येथील एक तरुण समाजसेवेच्या उद्देशाने धारावीतील नागरिकांना जेवण घेऊ न जात होता, त्यालाही कोरोनाची लागण झाली आहे. तर येथील एक रिक्षाचालक हा नेहमी भाजीपाला आणण्याासाठी जात होता तोदेखील आता कोरोनाबाधीत झाला आहे. त्यामुळे तुम्ही भाजीपाला आणण्यासाठी बाहेर जात असाल, तर सावध व्हा. आता तरी हाच संदेश यातून देण्याचा प्रयत्न आता केला जात आहे. तिसरा स्पॉट पडवळनगर, शिवाजीनगर आणि महाराष्टÑनगर हे परिसर हायरिस्कमध्ये आले आहेत. पडवळनगरमध्ये पाच रुग्ण आढळले असून, येथे एका दाम्पत्याला लागण झाली आहे. मुंब्य्रात येजा करणाºयाला लागण, तर आणखी एका दाम्पत्यालाही लागण झाली.कारण नसताना घराबाहेर पडू नका, असे प्रशासनामार्फत वारंवार आवाहन करूनही अनेक नागरिक याकडे कानाडोळा करून घराबाहेर पडताना दिसत आहेत. त्यामुळे सामूहिक संसर्गाची लागण आता वागळे इस्टेटमध्ये झाल्याचे दिसून येत आहे.शिवाजीनगरमध्ये दोन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यातील एक रुग्ण हा रिक्षाने भाजीपाला आणत होता. येथील महाराष्टÑनगरातही एक रुग्ण आढळला आहे. त्याची प्रकृती बरी असून, रुग्णालयाने त्याला डिस्चार्जही दिला आहे. एकूणच समाजसेवा करणे, अत्यावश्यक सेवांसाठी बाहेर पडणे, भाजीपाला आणणे, जेवण देणे, दुसऱ्यांना मदत करणे आणि इतरांच्या संपर्कात आल्याने वागळे इस्टेटमधील रुग्णांचा आकडा काही दिवसांतच २९ वर जाऊन पोहोचला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या