ठाणे : ठाणे जिल्ह्यात दिवसागणिक कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यात गुरुवारी जिल्ह्यासह कल्याण डोंबिवली महापालिकेत कोरोनाबाधित रुग्णांची आतापर्यंतचा उच्चांक नोंदवला गेला आहे. त्यामुळे गुरुवारी जिल्ह्यात दिवसभरात बाधितांची संख्या एक हजार ९२१ तर, ३१ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या ३६ हजार ५६७ तर, मृतांची संख्या १ हजार १३० झाली आहे.
गुरुवारी कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात सर्वाधिक ५६० रुग्णांसह चार जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे बाधितांची संख्या ७ हजार ४८५ तर, मृतांची संख्या १२७ इतकी झाली आहे. ठाणे महापालिका हद्दीत ३९५ बाधितांची तर, ११ जणांच्या मृत्यूची नोंद झाल्याने बाधितांची संख्या ९ हजार ५३० तर, मृतांची संख्या ३५२ वर गेली आहे. नवी मुंबई महापालिकेत २६५ रुग्णांची तर, सात जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे बाधितांची संख्या ७ हजार ८८ तर, मृतांची संख्या २२४ वर पोहोचली आहे. भिवंडी महापालिका क्षेत्रात ८८ बाधितांसह २ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यामुळे बाधितांची संख्या २ हजार १११ तर, मृतांची संख्या ११४ वर पोहोचली. मीरा- भार्इंदरमध्ये १७१ रुग्णांची तर, चार मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या ३ हजार ६०९ तर, मृतांची संख्या १४९ इतकी झाली आहे.
उल्हासनगरमध्ये १७४ रुग्णांची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या २ हजार १५६ झाली आहे. अंबरनाथमध्ये ६३ रुग्णांची तर, १ च्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या एक हजार ९३१ तर, मृतांची संख्या ५२ झाली आहे. बदलापूरमध्ये ५१ रुग्णांची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या ८५८ झाली आहे. तर, ठाणे ग्रामीण भागात १५४ रुग्णांची तर, दोघांच्या मृत्यूची नोंद झाल्याने बाधितांची संख्या एक हजार ७७९ तर, मृतांची संख्या ५० वर गेली आहे.वसई-विरारमध्ये ३०५ नवे रुग्ण ५ रुग्णांचा मृत्यूवसई : वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रामध्ये गुरुवारी दिवसभरात ३०५ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले, तर ११४ जणांनी मात केली आहे. त्याच वेळी पाच रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामुळे आता पालिका हद्दीतील कोरोनाबाधितांची संख्या ४६१७ वर पोहचली आहे. दरम्यान, महापालिका क्षेत्रात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने पालिकेच्या दृष्टीने ही बाब चिंतेची ठरत असून नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण आहे.नवी मुंबईमध्ये सात हजारचा टप्पा पूर्ण; ५२ रूग्ण वाढलेनवी मुंबई : शहरात गुरूवारी कोरोनाचे २६५ रूग्ण वाढले आहेत.तर सात जणांचा मृत्यू झाला. एकूण रूग्ण संख्या ७,0८८ झाली आहे. गुरूवारी नेरूळ मध्ये सर्वाधिक ५२ रूग्ण वाढले आहेत. सात हजार चा टप्पा ओलांडल्यामुळे नागरिकांमधील असुरक्षितेची भावना वाढली आहे. आतापर्यंत एकूण २२४ जणांचा मृत्यू झाला आहे. रूग्ण बरे होण्याची टक्केवारी घसरू लागली आहे. गुरूवारी १३१ जण बरे झाले आहेत. आतापर्यंत ३९६५ जण बरे झाले आहेत. रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ६0 वरून ५६ वर आले आहे.रायगडमध्ये दिवसभरात २४७ रुग्णांची नोंदरायगड : जिल्ह्यात गुरुवारी २४७ नव्या कोरोना पॉझिटिव्ह रु ग्णांची नोंद झाली आहे.तर सहा रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे बाधित रु ग्णांची संख्या ४४५९ वर पोहोचली आहे. गुरुवारी दिवसभरात पनवेल महानगरपालिका क्षेत्रात ११५, पनवेल ग्रामीणमध्ये ६७, उरण ०४, अलिबाग १२, कर्जत ६, पेण १३, खालापूर १४, माणगाव १५, रोहा १६, श्रीवर्धन ३, तळा १, असे एकूण २४७ कोरोना पॉझिटिव्ह रु ग्ण आढळून आले.आतापर्यंत बाधित रु ग्णांपैकी २५५७ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. १४० रु ग्णांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत १७३२ पॉझिटिव्ह रु ग्णांवर उपचार सुरु आहेत.