शहरं
Join us  
Trending Stories
1
हरयाणात BJP, जम्मू-काश्मिरात इंडिया; महाराष्ट्रात काय होणार? महायुती-मविआत कोणाचा दबाव वाढेल?
2
हरयाणात घडले तेच महाराष्ट्रातही घडणार; भाजपच्या जल्लोष सभेत देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास
3
अखेर ठरले... अजित पवार बारामतीतूनच लढणार; प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केली उमेदवारी
4
जम्मू-काश्मीरमध्ये 'इंडिया', ओमर अब्दुल्ला होणार मुख्यमंत्री; आपनेही खाते उघडले
5
हरयाणात भाजपची हॅट्ट्रिक; काँग्रेसच्या पाच जागा वाढल्या, पण बहुमताची हुलकावणी
6
मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करा; उद्धव ठाकरे यांचे काँग्रेस, शरद पवार गटाला आवाहन
7
ओमर हेच मुख्यमंत्री, वाटेकरी कुणीच नाही; फारूख अब्दुल्लांनी केले जाहीर, काँग्रेसचे ६ विजयी
8
०.८५ टक्के कमी मते अन् गमावल्या ११ जागा; भाजप-काँग्रेसच्या मतांची टक्केवारी जवळपास सारखीच
9
जम्मू-काश्मीर विधानसभा निकालात ‘इंडिया’ने मारली बाजी, तरी भाजप ठरला बाजीगर
10
हरयाणामध्ये भाजप जिंकण्यामागचे गणित काय? काँग्रेसच्या हातात असलेला विजय हिसकावला
11
मागासवर्गीय मतदारांनी काँग्रेसकडे फिरविली पाठ; हरयाणात जाट-बिगर जाट मतांचे ध्रुवीकरण
12
काँग्रेसच्या मनोबलावर परिणाम होणार नाही; हरयाणा निकालावर रमेश चेन्नीथलांचे मत
13
बहिणीच्या दसरा मेळाव्याला भाऊ उपस्थित राहणार का? पंकजा, धनंजय मुंडे महायुतीत असल्याने चर्चा
14
मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...
15
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
16
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
17
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
18
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
19
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
20
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी

Coronavirus : लसीचा साठा न आल्याने मीरा-भाईंदर पालिकेची १० लसीकरण केंद्र बंद तर केवळ २ केंद्रच सुरू  

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2021 11:12 PM

Corona Vaccination : मीरा भाईंदर महापालिके कडे दुसऱ्या डोस साठीच्या ४ हजार ४४० लस शिल्लक आहे . त्यात कोवॅक्सीनचे २१८० व कोविशील्डच्या २२६० लसी आहेत . ह्या लसी ४५ वर्ष वरील नागरिकांसाठीच्या दुसऱ्या डोस साठी लागणार आहेत .

मीरारोड - लसीचा पुरवठा न झाल्याने मीरा भाईंदर महापालिकेला त्यांची १० लसीकरण केंद्र सोमवारी बंद करावी लागली आहेत . दोन लसीकरण केंद्रांवरच लस दिली जात असल्याने नागरिकांची उसळून वाद व नाराजीचे प्रकार वाढले आहेत . 

मीरा भाईंदर महापालिके कडे दुसऱ्या डोस साठीच्या ४ हजार ४४० लस शिल्लक आहे . त्यात कोवॅक्सीनचे २१८० व कोविशील्डच्या २२६० लसी आहेत . ह्या लसी ४५ वर्ष वरील नागरिकांसाठीच्या दुसऱ्या डोस साठी लागणार आहेत . जेणे करून पालिकेने लस येई पर्यंत भाईंदरच्या भीमसेन जोशी रुग्णालय व मीरारोडच्या इंदिरा गांधी रुग्णालयातील लसीकरण केंद्रच सोमवारी सुरु ठेवली होती . बाकी १० लसीकरण केंद्र बंद करावी लागली . 

सध्या १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना जोशी रुग्णालयातील लसीकरण केंद्रातच लस दिली जात आहे . त्यासाठी १८१० इतका लस साठा शिल्लक असल्याने मंगळवारी केवळ ४०० लसीच दिल्या जाणार आहेत . ह्या गटातील नागरिकांसाठी एकच केंद्र असल्याने जोशी रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी मोठी गर्दी उसळत आहे . ऑनलाईन नोंदणी व डोसची तारीख मिळाल्या शिवाय कोणी येऊ नये असे आवाहन करून सुद्धा गर्दी होत असून त्यात वाद व नाराजीचे प्रकार होत आहेत . 

इंदिरा गांधी रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर सुद्धा मंगळवारी फक्त दुसरा डोस ची तारखा असणाऱ्यांचे लसीकरण  केले जाणार आहे . मंगळवारी लसीचा पुरवठा होईल अशी पालिका अधिकाऱ्यांना आशा असून लस मिळताच अन्य केंद्र सुरु केली जातील असे सांगण्यात येत आहे . परंतु शहरातील जवळपास सर्वच लसीकरण केंद्र बंद असल्याने लोकां मध्ये नाराजी असून अनेकांनी केंद्रावर गर्दी केली होती .  

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसMira Bhayanderमीरा-भाईंदर