शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे विधानसभा निवडणूक लढणार नव्हते, पण...; नरेश म्हस्केंचा गौप्यस्फोट
2
"उगाच काही सांगायचं, पटेल असं तरी..."; विरोधकांच्या योजना किती कोटींपर्यत जातायत? अजित दादांनी गणितच सांगितलं
3
प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याच्या बैठकीत राडा; साधुसंतांनी एकमेकांवर चालविल्या लाथाबुक्क्या
4
"याबाबत फडणवीस यांचं काय मत आहे?"; फोटो दाखवत पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल
5
नवऱ्याला सोडलं अन् बॉयफ्रेंडशी लग्न ठरवलं; वधू वाट पाहत होती पण वरात आलीच नाही, कारण...
6
भारतीय अधिकाऱ्यांनी घेतली अफगाणी संरक्षण मंत्र्याची भेट; पाकिस्तानची उडाली झोप...
7
धक्कादायक! लॉरेन्स बिश्नोई अन् दाऊद इब्राहिमच्या फोटोंचे टी-शर्ट;फ्लिपकार्टसह 'या' साईटविरोधात गुन्हा दाखल
8
टेम्पो-कारचा भीषण अपघात; आईसह दोन लेकी, नातीचा जागीच मृत्यू
9
"सरकारचे शेवटचे १५ दिवस; मविआ भाजपासारखी फसवणूक करणार नाही", काँग्रेसचा टोला
10
निकालानंतर सत्तेची समीकरणं बदलणार?; ; अजित पवार गटाच्या आणखी एका नेत्याचा दावा
11
वंदे भारतने मुंबई सुरतला जोडणार; फायद्यातील ट्रॅक ठरण्याची शक्यता, ट्रायल पूर्ण
12
निर्लज्जपणाचा कळस! ऋतुराज पंचांसह खेळाडूंवर संतापला; 'महाराष्ट्रा'साठी आवाज उठवला
13
संगीता ठोंबरेंचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; राज्य पातळीवर मिळाली मोठी जबाबदारी!
14
'हंटर' मधील बोल्ड सीन्सवर सई ताम्हणकरचं भाष्य; म्हणाली, "कुटुंबियांना पचलंच नव्हतं पण..."
15
Maharashtra: "अजित पवार जोपर्यंत भाजपसोबत, तोपर्यंत एकत्र येणे..."; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
16
कमाल! IAS, IPS न होता वयाच्या २१ व्या वर्षी झाली मोठी अधिकारी; कोचिंगशिवाय पास केली UPSC
17
सेटवर शूटिंगदरम्यान सुनील शेट्टी जखमी, अ‍ॅक्शन सीन करताना बसला मार! आता प्रकृती कशी?
18
Vidhan Sabha 2024: उमरेडमध्ये 'पारवें'चे डबल इंजिन धावणार की, काँग्रेसचे 'दलित कार्ड' चालणार?
19
भारताविरूद्धच्या मालिकेआधी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का; दुखापतग्रस्त खेळाडूने मैदान सोडले!
20
शेअर बाजारात २ दिवसांत कमावलं, ते काही तासांत गमावलं! या सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण

coronavirus: ठाणे जिल्ह्यात आज सापडले कोरोनाचे ११३४ नवे रुग्ण; पाच जणांचा मृत्यू  

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2021 8:41 PM

coronavirus In Thane : जिल्ह्यात आता दोन लाख ७६ हजार ५८६ रुग्ण नोंदल्या गेले असून मृतांची संख्या सहा हजार ३३७ झाली आहे. 

ठाणे - जिल्ह्यात कोरोनाच्या एक हजार १३४ रुग्णांची वाढ रविवारी झाली असून पाच जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आता दोन लाख ७६ हजार ५८६ रुग्ण नोंदल्या गेले असून मृतांची संख्या सहा हजार ३३७ झाली आहे.     ठाणे शहरात ३२८  रुग्ण सापडले आहे. आता या शहरात ६५ हजार ५४४ बाधीत रुग्ण झाले. आज एकही मृत्यू न झाल्याने येथील मृतांची संख्या एक हजार  ४१२ कायम आहे. कल्याण - डोंबिवलीत ४०४ रुग्णांची वाढ असून तिघांचा मृत्यू आहे. या शहरात ६६ हजार ९५७ बाधीत झाले असून एक हजार २१४ मृत्यूची नोंद आहे.

 उल्हासनगरत ६६ बाधीत सापडले असून एकही मृत्यू नाही. आतापर्यंत बाधीत १२ हजार १७४ झाले असून ३७३ मृत्यू आहे. भिवंडीला १८ बधीत आढळून आला नसून मृत्यूची नोंदही नाही. आता बाधीत सहा हजार ९३८ असून मृतांची संख्या ३५६ आहे. मीरा भाईंदरमध्ये ६४ रुग्णांची नोंद झाल्यामुळे या शहरात आता बाधितांची २७ हजार ९१८ झाली असून मृतांची संख्या ८०६ आहे. 

अंबरनाथमध्ये ३७ रुग्णांची वाढ असून एकही मृत्यू नाही. आता बाधितांची संख्या नऊ हजार १५९ असून मृत्यू ३१६ नोंदलेले आहेत. बदलापूरला ४५ रुग्णांची नोंद झाल्यामुळे एकूण बाधीत १० हजार ४९४  झाले आहेत. या शहरात एकही मृत्यू नसून १२३ मृत्यूची नोंद आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण क्षेत्रात नऊ रुग्णांची नोंद असून मृत्यू नाही. या परिसरात आता बाधीत १९ हजार ८७० आणि मृत्यू ५९८ आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे