शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

coronavirus: ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे १४३० रुग्ण नव्याने सापडले, ३० जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2020 7:29 PM

ठाणे जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख ८१ हजार ४९९ रुग्णांची नोंद झाली आहे. तर जिल्ह्यात चार हजार ५८९ मृतांची नोंद आजपर्यंत झाली आहे, अशी माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाने दिली आहे. 

ठाणे  - जिल्ह्यात एक हजार ४३० रुग्णांची रविवारी नव्याने वाढ झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख ८१ हजार ४९९ रुग्णांची नोंद झाली आहे. आज ३० जणांच मृत्यू झाल्यामुळे आता जिल्ह्यात चार हजार ५८९ मृतांची नोंद आजपर्यंत झाली आहे, अशी माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाने दिली आहे. ठाणे शहरात ३७३ रुग्ण आज नव्याने सापडले आहेत. या शहरात ३८ हजार ३४८ रुग्णांची नोंद आतापर्यंत करण्यात आली. तर, सहा जणांचा मृत्यू झाल्यामुळे आता मृतांची संख्या एक हजार २४ झाली आहे. तर कल्याण - डोंबिवली शहरात ३९२ रुग्णांची आज वाढ झाली असून सहा मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आतापर्यंत ४३ हजार ७८४ रुग्ण बाधीत झाले. तर, ८५० मृत्यूची नोंद आज करण्यात आली आहे.उल्हासनगरला ५० नवे रुग्ण आढळले असून, दोन जणांचा आज मृत्यू झाला आहे. या शहरात आतापर्यंत बाधीत रुग्ण नऊ हजार ३९९ झाले आहेत. तर,  मृतांची संख्या ३०८ नोंदवण्यात आली आहे. भिवंडीला आज ५२ बाधीत आढळून आले आहेत. तर, आज एकही मृत्यू झाला नाही. आता बाधीत पाच हजार २०८ असून मृतांची संख्या ३१३ झाली आहे. मीरा भाईंदरमध्ये १७९ रुग्णांची तर, पाच मृत्यूची नोंद केली आहे. या शहरात आता बाधितांची संख्या १९ हजा २४९ झाली आहे, तर, मृतांची संख्या ५९२ झाली आहे.अंबरनाथमध्ये ४० रुग्णांची नव्याने वाढ झाली असून तीन मृत्यूची नोंद झाली आहे. आत बाधितांची संख्या सहा हजार ४९१ झाली असून मृतांची संख्या २३४ वर गेली आहे. बदलापूरमध्ये ५८ रुग्णांची नोंद झाल्यामुळे आता बाधीत सहा हजार ३९४ झाले आहेत. या शहरात आजही मृत्यू झाला नाही. आतापर्यंत ७७ मृत्यूची नोंद कायम आहे. जिल्ह्यातील गांवपाड्यांमध्ये एक रुग्ण नव्याने वाढला असून आज एकही मृत्यू झाला नाही. आता बाधीत १४ हजार ५२४ आणि मृत्यू ४१३ झाले आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे