ठाणे : ठाणे जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत सोमवारी दिवसभरात ६२४ रुग्णांची वाढ झाली असून, १५ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या १६ हजार ४८७ तर, मृतांची संख्या ५२६ झाली आहे.सोमवारी ठाणे महानगरपालिका हद्दीत १६४ बाधितांची नोंद होऊन, रुग्णांची संख्या ५ हजार ३०३ झाली आहे. दिवसभरात पाच रुग्णांचा बळी गेला असून, मृतांची संख्या १६३ वर गेली आहे. नवी मुंबई महापालिकेत ९५ रुग्णांची नोंद झाली असून, तिघांचा मृत्यू झाला आहे. येथील बाधितांची संख्या ३ हजार ९९८, तर मृतांची संख्या १२१ वर पोहोचली आहे. कल्याण, डोंबिवलीमध्ये १३१ रुग्ण आढळले असून, दोन जणांचा मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. बाधितांचा आकडा २ हजार २८०, तर मृतांची संख्या ६२ झाली आहे. मीरा भाईंदरमध्ये ६० रुग्ण आढळल्याने, बाधितांची संख्या १ हजार ६५३ इतकी झाली आहे. भिवंडी महापालिका हद्दीत ४६ रुग्णांची नोंद झाली असून दिवसभरात ४ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे बाधितांची संख्या ६२० इतकी झाली असून मृतांची संख्या ४६ झाली आहे. उल्हासनगरमध्ये २७ रुग्णांची नोंद झाल्याने एकूण बाधितांची संख्या ७८७ झाली आहे. अंबरनाथमध्ये ६४ रुग्ण नव्याने सापडल्याने बाधितांची संख्या ७४४, तर मृतांची संख्या २० झाली आहे. बदलापूरमध्ये १३ रुग्णांची नोंद होऊन बाधितांची संख्या ४२४ झाली आहे. ठाणे ग्रामीण भागात २४ रुग्णांची नोंद होऊन बाधितांची संख्या ६७८ वर गेली आहे. या भागात दिवसभरात एकाच मृत्यू झाला आहे.
CoronaVirus News: ठाणे जिल्ह्यात दिवसभरात १५ जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2020 4:24 AM