ठाणे : जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभरात एक हजार ६४३ रुग्णांचा शोध घेण्यात आला. यामुळे जिल्ह्यात आता एक लाख ३० हजार ७२ रुग्ण झाले आहेत. तर, २५ जणांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील मृतांची संख्या तीन हजार ६६८ झाल्याची माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाने दिली.ठाणे महापालिका शहरात २७८ कोरोनाचे रुग्ण आढळले. शहरात २७ हजार १३ कोरोनाच्या रुग्णांची नोंद आतापर्यंत करण्यात आली आहे. कल्याण-डोंबिवली परिसरात ४८६ रुग्णांची वाढ झाली. यामुळे शहरातील बाधितांची संख्या ३० हजार ५४०, तर मृतांची संख्या ६६५ झाली आहे. उल्हासनगरला २७ रुग्ण आढळले असून दोन जणांचा मृत्यू झाला. भिवंडी महापालिका क्षेत्रात २२ रुग्ण सापडल्याने बाधितांचा आकडा चार हजार २९० वर गेला आहे. मीरा-भार्इंदरला १८४ नवीन रुग्ण सापडले, आहेत. अंबरनाथ शहरात २६ रुग्ण नव्याने आढळले असून तिघांचा मृत्यू झाला. बदलापूरमध्ये ७९ रुग्ण वाढल्यामुळे बाधित रुग्ण चार हजार ४१० झाले आहेत.नवी मुंबईमध्ये ४१९ रूग्ण वाढलेनवी मुंबई : शहरात दिवसभरात ४१९ रूग्ण वाढले असून नेरूळमध्ये सर्वाधिक १०३ रूग्ण आढळून आले आहेत. शहरातील एकूण रूग्ण संख्या २७,५३१ झाली आहे. शहरात दिवसभरात ३४३ रूग्ण बरे झाले आहेत.वसई-विरारमध्ये २१९ नवीन रुग्णवसई : वसई-विरार शहरात शुक्रवारी दिवसभरात पाच कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. तसेच दिवसभरात २१९ नवे रुग्ण आढळून आले असून ११६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.रायगड जिल्ह्यात ७२१ कोरोनाबाधितअलिबाग : रायगड जिल्ह्यात शुक्रवारी ४ सप्टेंबर रोजी ७२१ नव्या कोरोना पॉझिटिव्ह रु ग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे शुक्रवारी अखेर बाधित रु ग्णांची संख्या २९ हजार ८६८ वर पोहोचली आहे. आतापर्यंत बाधित रु ग्णांपैकी २४ हजार ७९४ रु ग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. ८७० रु ग्णांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत ४३७४ पॉझिटिव्ह रु ग्णांवर उपचार सुरु आहेत.
coronavirus: ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या १६४३ रुग्णांची वाढ, दिवसभरात २५ मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2020 7:31 AM