ठाणे : जिल्ह्यात गुरुवारी १९५ नवीन रुग्णांची नोंद झाल्याने रुग्णसंख्या दोन हजार ९०३ इतकी झाली आहे. तर सात जणांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ८७ वर पोहोचला आहे.गुरुवारी सर्वाधिक रुग्ण हे ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात नोंदवले गेले असून ठामपानेही नऊशेचा आकडा पार केला आहे. तर नवी मुंबईत ही ६४ रुग्णांची नोंदणी झाली आहे. तर सर्वात कमी एक रुग्ण हा भिवंडीत आढळल्याची माहिती ठाणे जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली.ठामपा हद्दीत सर्वाधिक ७० नवीन रुग्णांची नोंदणी झाली असून येथील रुग्ण संख्या ९१३ झाली आहे. तसेच शहरात पाच जण दगावल्याने मृतांचा आकडा ४२ झाला आहे. तर मीरा-भार्इंदरमध्ये २१ नव्या रुग्णांमुळे रुग्ण संख्या २८६ झाली आहे. उल्हासनगर येथे ११ नवे रुग्ण सापडल्याने रुग्ण संख्या ७९ झाली असून त्यातच एकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा ४ वर गेला आहे. ठाणे ग्रामीणमध्येही ९ नवे रुग्णांचे निदान झाल्याने रुग्ण संख्या १२९ झाली आहे. बदलापुरात नवीन ७ रुग्ण मिळाल्याने रुग्णसंख्या ७५ वर गेली आहे. कल्याण- डोंबिवलीत सापडलेल्या ६ नवीन रुग्णांमुळे तेथील रुग्णांचा आकडा ३९१ आहे. एकाचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या ही ८ वर गेली आहे.अंबरनाथमध्ये ६ नवीन रुग्ण मिळाल्याने रुग्णसंख्या ही २३ झाली आहे. तर एकच नोंदवलेल्या नव्या रुग्णाने भिवंडीतील रुग्णांचा आकडा ३३ झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.चार प्रभाग तीन दिवस बंदकोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकमान्यनगर, वागळे इस्टेट भाग हा अनिश्चित काळासाठी बंद केल्यानंतर आता माजिवडा मानपाडा प्रभाग समितीमधील प्रभाग १, २, ३ आणि ८ हे परिसरदेखील पुढील तीन दिवस पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.नवी मुंबईत ६४ नवे रुग्णनवी मुंबई : नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात ६४ नवे रुग्ण आढळले असून एकूण संख्या ९७४ झाली आहे. तसेच रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. गुरुवारी ५३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून बरे झालेल्यांची संख्या २५५ झाली आहे.गुरुवारी कोपरखैरणेत २०, तुर्भे- सानपाड्यात १५, वाशीत ११, नेरूळमध्ये ४, ऐरोलीत २ व घणसोलीत एक कोरोनामुक्त झाला.शहरातील ७,६५३ जणांची चाचणी करण्यात आली असून तब्बल ५,६२३ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. गत आठवड्यात प्रलंबित अहवालाचा आकडा १८०० झाला होता. हे प्रमाण आता १०५६ इतके आहे. शहरातील १०३९३ नागरिकांना क्वारंटाइन केले होते. त्यापैकी ८६१६ जणांनी क्वारंटाइन कालावधी पूर्ण केला आहे.नवी मुंबईमध्ये गुरूवारी आढळलेल्या रुग्णांमध्ये नेरूळमधील १३, ऐरोलीसह कोपरखैरणेत १२, घणसोली, तुर्भे व बेलापूरमध्ये ५, दिघामध्ये ७ नवीन रुग्ण आढळले.
coronavirus: ठाणे जिल्ह्यात १९५ नवे रुग्ण, सात जणांचा मृत्यू, शहरात रुग्ण वाढले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2020 2:17 AM