शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
2
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
3
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
4
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
5
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
6
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
7
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
8
विदर्भातील 'या' १२ आमदारांना मतदारांनी नाकारले; महायुतीच्या आमदारांनाही दिला झटका 
9
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
10
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
11
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
12
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय
13
लाडक्या बहिणींना पहिला हप्ता कधी येणार? १५०० की २१०० रुपये...; दिवाळी बोनस मिळणार की नाही...
14
मला फक्त विधानपरिषद नको, गृह किंवा अर्थखातं हवं; लक्ष्मण हाकेंची महायुतीकडे मागणी
15
Video: उच्चशिक्षित इंजिनीअर, प्रेयसीच्या विरहात बनला भिकारी; अवस्था पाहून लोकंही हळहळले
16
Maharashtra Vidhan Sabha Elecation 2024: नाना पटोलेंवर प्रफुल्ल पटेल वरचढ!
17
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची खेळी, वृद्धांसाठी मोठी घोषणा, दरमहा मिळणार 'इतकी' पेन्शन!
18
उर्वशी रौतेलाने सांगितलं अद्याप अविवाहित असल्याचं कारण; म्हणाली, "माझ्या जन्म पत्रिकेत..."
19
मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणूक लढविली, तोच उमेदवार शिंदे गटात जाणार; लता शिंदेंच्या उपस्थितीत घोषणा
20
भारतात ईव्हीएम हवे की, बंद व्हावे? बघा सर्व्हे काय सांगतो?

CoronaVirus : ठाणे जिल्ह्यात रविवारी समोर आले २ हजार ७४४ नवे कोरोना बाधित, ४२ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2021 10:30 PM

ठाणे मनपा परिसरात रविवारी ७५६ रुग्ण आढळून आले. यांसह येथील रुग्ण संख्या एक लाख २० हजार ४०९ वर गेली आहे. (CoronaVirus)

ठाणे- कोरोना व्हायरसने संपूर्ण राज्यात थैमान घातले आहे. ठाणे जिल्ह्यात रविवारी २ हजार ७४४ नवे रुग्ण समोर आले आहेत. तर गेल्या २४ तासांत ४२ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आजपर्यंत तब्बल चार लाख ७२ हजार ७९४ रुग्ण समोर आले असून मृतांचा आकडा सात हजार ६८५ वर पोहोचला आहे. (CoronaVirus: 2 thousand 744 new corona infected in Thane district on Sunday, 42 dead)

ठाणे मनपा परिसरात रविवारी ७५६ रुग्ण आढळून आले. यांसह येथील रुग्ण संख्या एक लाख २० हजार ४०९ वर गेली आहे. या शहरात आजही आठ बाधीत दगावल्याने मृतांची संख्या एक हजार ६८९ झाली आहे. कल्याण डोंबिवली शहरात ७२९ रुग्ण आढळल्याने एकूण रुग्ण संख्या एक लाख २२ हजार २७५ झाली. दिवसभरातील आठ मृतांमुळे आतापर्यंत एक हजार ४५३ मृत्यू नोंदवण्यात आले आहे.

खूशखबर! रशियन कोरोना लस Sputnik-Vची पहिली खेप भारतात दाखल; जाणून घ्या, किती आहे प्रभावीउल्हासनगरला आजही ७४ रुग्णांच्या वाढीसह दोन मृत्यू झाले. आता येथील रुग्ण संख्या १९ हजार २३ झाली असून ४३६ मृतांची नोंद केली गेली. भिवंडीला दिवसभरात २४ रुग्ण सापडले असून एकाचा मृत्यू झाला आहे. येथील एकूण रुग्ण नऊ हजार ८९६ झाले असून ३९२ जणांचा मृत्यू झाला आहे. मीरा भाईंदरला आज २६२ रुग्णांसह आठ मृतांची नोंद झाली. आता येथील एकूण रुग्ण संख्या ४४ हजार १८९ वर पोहोचली असून १ हजार ४९ जणांच्या मृतांची नोंद करण्यात आली आहे. 

CoronaVirus: ...म्हणून ठाकरे सरकारला शाबासकी मिळायला हवी, भाजप खासदाराकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक अंबरनाथला १०३ रुग्णांच्या वाढीसह दोन जणांचा मृत्यू झाला. येथील रुग्ण संख्या आता १७ हजार ९४८ झाली आहे तर ३८८ मृतांची नोंद झाली आहे. कुळगांव बदलापूरमध्ये १४९ रुग्णांची भर पडली आहे. मात्र आज येथे एकही मृत्यू नाही. आता येथील १८ हजार ८०५ रुग्णांसह १९४ मृतांची नोंद करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या गांवपाड्यांमध्ये आज २२३ रुग्ण आढळून आले असून दोन जण दगावले. या परिसरात आजपर्यंत २७ हजार पाच रुग्णांची वाढ होऊन ६९६ मृतांची नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याthaneठाणेbadlapurबदलापूरulhasnagarउल्हासनगरambernathअंबरनाथ