ठाणे : कोलशेत रोडवरील ‘लोढा आमरा’ येथे झालेल्या हाणामारीतील १३ पैकी एका आरोपीची कोरोना तपासणी शनिवारी पॉझिटिव्ह आली. त्याला ठाणे जिल्हा रुग्णालयात Þदाखल केले असून उर्वरित १२ आरोपींना भार्इंदरपाडा केंद्रात क्वॉरंटाइन केले आहे. या आरोपींच्या संपर्कातील २० पोलिसांना क्वॉरंटाइन केले असून सर्वांची तपासणी करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.कोलशेत रोड येथील लोढा आमरा या सोसायटीमध्ये नळावरील पाणी भरण्यावरून काही मजुरांमध्ये कडाक्याचे भांडण झाले होते. प्रकरण अगदी हाणामारीवर गेले. या प्रकरणी ४ मेला कापूरबावडी पोलीस ठाण्यात रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास तक्रार दाखल झाल्यानंतर १३ जणांना पोलिसांनी अटक केली. या सर्वांना न्यायालयाने ५ मे रोजी न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर सर जेजे रुग्णालयात त्यांची ६ मे रोजी कोरोना तपासणी झाली. त्यात एकाचा अहवाल ९ मे रोजी पॉझिटिव्ह आला. त्यामुळे जामिनावर मुक्तता होऊनही उर्वरित १२ आरोपींना भार्इंदर येथील केंद्रात क्वॉरंटाइन केले. कोरोनाग्रस्त आरोपीस ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.
coronavirus: कोरोनाग्रस्त आरोपीमुळे २० पोलीस क्वॉरंटाइन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 4:50 AM