कल्याण : केडीएमसी हद्दीत कोरोनाचे २२ नवे रुग्ण आढळून आले आहेत. नव्या रुग्णांमध्ये पाच महिन्यांच्या बालकाचा आणि सरकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. हे बालक कल्याण पश्चिमेतील आहे. आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ३६६ झाली आहे.कल्याण पूर्वेतील पोलीस आणि सरकारी सेवेतील कर्मचाºयालाही कोरोना झाला आहे. याच परिसरातील मुंबईतील एका बँकेच्या अध्यक्षालाही कोरोना झाला आहे. खाजगी रुग्णालयातील दोन कर्मचाऱ्यांना कोरानाची लागण असून ते मोहने आणि कल्याण पश्चिम परिसरात राहणारे आहेत. डोंबिवली पश्चिमेतील भिवंडी येथील खाजगी कंपनीत काम करणाºयास कोरोना झाला आहे. डोंबिवली पश्चिम आणि कल्याण पूर्वेतील दोन कर्मचाºयांनाही लागण झाली आहे. आणखी १४ जणांना ते मुंबईत जाणाºया कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आल्याने लागण झाली आहे. त्यात पाच महिला, एक नऊ वर्षांची मुलगी आणि एका १२ वर्षांच्या मुलाचा समावेश आहे. त्यातील आठ जण कल्याण पूर्वेत, दोन जण डोंबिवली पूर्वेत आणि चार जण हे कल्याण पश्चिमेत राहणारे आहेत.
coronavirus: कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचे नवे २२ रुग्ण, रुग्णसंख्या झाली ३६६
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2020 1:58 AM