- सुरेश लोखंडेठाणे : कोरोनाच्या या संकटात शेतकऱ्यांचे ही कंबरडे मोडल्याने उपाययोजना म्हणून त्यांना सावरण्यासाठी कृषी विभाग यंदाच्या खरीप हंगामासाठी ५५० हेक्टरवर भातलागवडीचे प्रात्यक्षिके घेणार आहे. यासाठी शहापूर व मुरबाड तालुक्यातील इतर शेतºयांना १८० क्विं टल व आदिवासी वनपट्टेधारकांºयांना ४० क्विं टल भातबियाणे या आठवड्यात मोफत वाटणार आहे, असे जिल्हा कृषी अधिक्षक अंकुश माने यांनी लोकमतला सांगितले.यात शहापूर, मुरबाड तालुक्यातील शेतकºयांच्या ४५० हेक्टरवर १८० आणि आदिवासींच्या १०० हेक्टरवरील भातलागवडीसाठी ४० क्विं टल बियाणे मोफत देण्यात येईल. या प्रमाणेच दोन हजार ३५० हेक्टरच्या बांधांवर तूर पेरण्यासाठी २० क्विं टल तूर आणि नाचणीचे तीन क्विटंल बियाण १०० हेक्टरसाठी मोफत दिले जाणार आहे. दोन्ही तालुक्यात प्रत्येकी ५० हेक्टर नवपट्टेच्या शेतीवर भाताची प्रात्यक्षिक लागवड केली जाणार आहे. त्यासाठी या प्रत्येक तालुक्यातील वनपट्टेधारकांना तब्बल २० क्विं टल भात बियाणे मोफत वाटप करण्याचे नियोजन यंदा केले आहे.यंदा या आदिवासी शेतकºयांवर वर्गणी व देणगीतून मिळणाºया रकमेतून बी बियाणे खरेदीचा प्रसंग ओढावला होता. यानुसार देणगी व वर्गणीच्या स्वरूपात ७० हजारांची पुंजी जमा झाली आहे.परंतु, कृषी विभागाने त्यांना मोफत बियाणे देण्याचा निर्णय घेतल्याचे लोकमतने श्रमिक मुक्ती संघटनेच्या सल्लागार अॅड. र्इंदवी तुळपुळे यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर त्यांनी जिल्हा कृषी अधिक्षक अंकूश माने यांचे आभार मानले. शासनाकडून मिळणारे भात बियाण्यांचे वाण कर्जत ३, कर्जत ७, रत्नागिरी आर. आर. ५, आर. आर. या भात वाणाच्या लागवडीसाठी बरोबर जमा झालेल्या रकमेतून शेतकºयांच्या पसंतीचे अन्य बियाणे खरेदी करणे आता शक्य झाल्याचे तुळपुळे यांनी सांगितले.गरव्या, हळव्या बियाणांची खरेदी शक्यएका एकरसाठी तब्बल १० किलो भाताचे बियाणे लागवडीसाठी लागते. शेतीच्या पोतनुसार शेतकरी एकावेळी वेगवेगळ्या वाणांची लागवड करून उत्पन्न घेतो. देणगीदारांकडून जमा झालेल्या व या पुढे जमा होणाºया रकमेतून जादा उत्पन्न देणाºया गरव्या, हळव्या भात बियाण्यांची खरेदी आता शेतकºयांच्या पसंतीनुसार करता येणार असल्याचे तुळपुळे म्हणाल्या.
शहापूर, मुरबाडच्या शेतकऱ्यांना २२० क्विंटल भात बियाणे मोफत, कृषी विभागाचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2020 1:42 AM