कल्याण : केडीएमसी हद्दीत सोमवारी कोरोनाचे २३ नवीन रुग्ण आढळले. या रुग्णांमध्ये डोंबिवली पश्चिमेतील एक महिन्याच्या बालिकेसह कल्याण पूर्वेतील दोन लॉड्री दुकानदार आहेत. तर, बरे झालेल्या रुग्णांची टक्केवारी ३० टक्के आहे.नव्या रुग्णांमध्ये कल्याण पश्चिमत राहणारी व सरकारी रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचारी, डोंबिवली पूर्व व कल्याण पश्चिमेत राहणाऱ्या व खाजगी लॅबमधील दोन महिला कर्मचारी आणि टिटवाळा येथील एक महिला खाजगी लॅबमधील कर्मचारी आहे. तसेच डोंबिवली पूर्व आणि कल्याण पूर्वेत राहणाºया एकूण दोन खाजगी बँक कर्मचारी आणि डोंबिवली पश्चिमेतील पोलीस कर्मचाºयाला कोरोना झाला आहे. मुंबईत जाणाºया अत्यावश्यक सेवेतील कोरोनाबाधितांच्या सहवासात आल्याने कल्याण पश्चिमेतील चौघे आणि पूर्वेतील आठ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. पूर्वेतील १६ वर्षीय तरुणाला कोरोना झाला आहे. त्याचा पूर्व इतिहास नाही.आतापर्यंतच्या ३४४ रुग्णांपैकी कल्याण-डोंबिवलीतून मुंबईत येजा करणाºया कोरोनाग्रस्त कर्मचाऱ्यांची संख्या १३७ आहे. या १३७ रुग्णांच्या संपर्कात आलेल्या ५९ निकट सहवासितांना कोरोना झाला आहे. उपचाराअंती १३ जणांना सोमवारी घरी सोडले असून, आतापर्यंत एकूण १०४ घरी आले आहेत.भिवंडीत पाच जणांना संसर्गभिवंडी : भिवंडीतील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. सोमवारी शहरात दोन तर ग्रामीण भागात तीन रुग्ण सापडले. शहरातील तीन रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. शहरात आझादनगरमध्ये ३९ वर्षीय पुरुष, तर ब्रह्मानंदनगर कामतघर येथील ३९ वर्षीय महिलेला कोरोना झाला आहे. आझादनगरमधील व्यक्ती ही इंदूर येथून, तर ब्रह्मानंदनगरमधील महिला वरळीहून (मुंबई) आली आहे. या दोन्ही रुग्णांच्या कुटुंबीयांना क्वारंटाइन केले आहे. तर, काल्हेर येथे दोन, तर राहनाळ येथे एक रुग्ण आढळल्याचे गटविकास अधिकारी डॉ. प्रदीप घोरपडे यांनी सांगितले. शहर आणि ग्रामीण मिळून एकूण रुग्णसंख्या ५३ झाली आहे. त्यापैकी १३ जण बरे झाले आहेत.अंबरनाथ, बदलापूरमध्येही रुग्णअंबरनाथ : अंबरनाथमध्ये सोमवारी कोरोनाचे दोन नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यातील एक रुग्ण हा मुंबई पोलीस दलात आहे. तर दुसरा रुग्ण हा कोरोनाबाधितांचा निकटवर्तीय आहे. बदलापूरमध्येही कोरोनाचे दोन नवीन रुग्ण आढळले आहेत.वडवली भागात राहणाºया मुंबई पोलीस दलातील एका कर्मचाºयाला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे वडवली परिसर सील केला आहे. तर दुसरा रुग्ण अंबरनाथ न्यू कॉलनी परिसरातील एका कोरोनाबाधिताचा निकटवर्तीय आहे. बदलापूरमध्ये कात्रप परिसरात दोन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. अंबरनाथमध्ये आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या १६, तर बदलापुरात ५६ वर गेली आहे.
coronavirus: कल्याण-डोंबिवलीत नवे २३ रुग्ण, एकूण रुग्णसंख्या पोहोचली ३४४ वर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 2:14 AM