कल्याण : कल्याणडोंबिवली महापालिका हद्दीत कोरोनाचे 3 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 117 झाली आहे. नव्या रुग्णांमध्ये एक स्टाफ नर्स आणि पोलीस कर्मचा-याचा समावेश आहे.
32 वर्षीय स्टाफ नर्स ही शासकीय रुग्णालयातील आहे. तिला कोरोनाची लागण झाली आहे. ती मांडा टिटवाळा परिसरात राहते. कल्याण पुर्वेतील 33 वर्षीय पोलिसाला कोरोना झाला आहे. डोंबिवली पुर्वेतील 61 वर्षीय वृद्धाला कोरोना झाला आहे. ते कोरोना रुग्णाच्या संपर्कात आल्याने त्यांना कोरोना झाला. आतापर्यंत उपचार घेऊन बरे झालेल्या 39 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 75 आहे.
दरम्यान, महापालिका हद्दीत प्लास्टिक पिशव्यांचा वापर बंद टाळावा असे आवाहन महापालिका प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. प्लास्टिक पिशव्यांवर कोरोनाचा विषाणू हा तीन दिवस जिवंत राहतो. त्यामुळे प्लास्टिक पिशव्यांचा वापर बंद करुन कापडी पिशव्या वापरा असे आवाहन केले आहे. 23 एप्रिलपासून प्लास्टिक पिशव्यांचा वापर कमी दिसून येत आहे. त्यामुळे प्लास्टिक कच-याचे प्रमाण कमी झाले आहे.
भाजीपाला विक्रेत्यांनाही प्लास्टिक पिशव्यांच्या वापराविषयी 21 एप्रिल रोजी बंद केली आहे. त्यांनी प्लास्टिक पिशव्यांचा वापर केल्यास प्लास्टिकबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.