कल्याण : कल्याणडोंबिवलीत कालर्पयत कोरोना बाधित रुग्णांची संख्या दहा होती. आज आणखीन चार जणांना कोरोनाची लागण झाल्याने कोरोना बाधित रुग्णांची संख्या 14 झाली आहे.
नव्या चार कोरोना बाधित रुग्णांपैकी एक रुग्ण 27 गावातील निळजे परिसरातील आहे. तीन रुग्ण हे डोंबिवली पूव्रेतील तर एक रुग्ण हा कल्याण पश्चिमेतील आहे. तीन रुग्ण हे मुंबईतील खाजगी रुग्णालयात तर उर्वरीत रुग्ण हे कस्तूरबा रुग्णालयात उपचार घेत आहेत. नव्या रुग्णांच्या सानिध्यात आलेल्या सात जणांना तपासणीकरीता कस्तूरबा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. त्यांच्या वैद्यकीय तपासणीचे अहवाल अद्याप प्राप्त झालेले नाहीत. याशिवाय एका महिलेला कोराना झाला आहे. मात्र तिच्या आधारकार्डवर पत्ता कल्याणचा असला तरी मागील दहा महिन्यापासून ती माहिम परिसरात राहत आहे. त्यामुळे तिची गणती कल्याण डोंबिवलीच्या नव्या रुग्णांमध्ये करण्यात आलेली नाही.
डोंबिवली पूर्व परिसरात आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी नागरीकांच्या आगमन प्रस्थानाला प्रतिबंध केला आहे. त्याची माहिती त्यांनी पोलिस उपायुक्त विवेक पानसरे यांना कळविली अहे. महापालिकेच्या रुक्मीणीबाई व शास्त्रीनगर रुग्णालयात कोरोना संशयीत रुग्णाना दाखल करुन घेण्यात येणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.
आमदार राजू पाटील यांचे ट्वीटडोंबिवली शहरानजीक असलेल्या रिजेन्सी गृह संकुलात कोरोना बाधित एक रुग्ण आढळून आला आहे. त्याला रुग्णवाहिका कल्याण डोंबिवली महापालिका उपलब्ध करुन देऊ शकलेली नाही. या परिसरात आणखीनही कोरोना संशयित अथवा बाधित रुग्ण असल्याची शक्यता आहे. महापालिकेकडून अशा प्रकारे व्यवस्था केली जात असल्यास कठीण आहे अशा प्रकारचे ट¦ीट मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केले आहे. हे ट¦ीट त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्य मंत्री राजेश टोपे व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महापालिका कार्यालयास केले आहे.