कल्याण - कोरोनाच्या संकटामुळे मार्चमध्ये लॉकडाऊन झाल्यापासून शाळा बंद आहेत. जोपर्यंत कोरोनाचे संकट दूर होत नाही, तोपर्यंत शाळा बंद राहणार आहेत. त्यामुळे राज्य सरकारच्या आदेशानुसार सध्या आॅनलाइन शिक्षण सुरू झाले आहे. मात्र, कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या ४० टक्के विद्यार्थ्यांकडे स्मार्ट फोन, टॅब, लॅपटॉप, पीसी नसल्याने हे विद्यार्थी आॅनलाइन शिक्षणापासून दूर आहेत. मात्र, त्यांना घरपोच शालेय पाठ्यपुस्तके पोहोचवली असल्याचा दावा शिक्षण विभागाने केला आहे.केडीएमसीच्या मराठी, उर्दू, गुजराती, हिंदी आणि तामिळ माध्यमांच्या एकूण ५९ शाळा आहेत. त्यात आठ हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी आहेत. परंतु, हे विद्यार्थी गरीब व सामान्य कुटुंबांतील असल्याने त्यांच्या पालकांकडे अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध असतील की नाही, याविषयी साशंकता आहे. मनपाने शाळेतील विद्यार्थ्यांना कोरोनाकाळात आॅनलाइन शिक्षण देणे सुरू केले आहे. मनपाच्या शिक्षण विभागाच्या निदर्शनास असे आले की, ४० टक्के विद्यार्थ्यांकडे टॅब, स्मार्ट फोन, पीसी, लॅपटॉपची सुविधा नाही. त्यामुळे हे विद्यार्थी आॅनलाइन शिक्षणापासून दूर आहेत. त्यामुळे शिक्षण विभागाने सर्व विद्यार्थ्यांच्या घरी पाठ्यपुस्तके पोहोचवली आहेत.कोरोनाकाळात मनुष्यबळाची कमतरता असल्याने मनपाच्या आरोग्य विभागाने शिक्षकांना कोरोना रुग्ण सर्वेक्षणासाठी घेतले आहे. त्यामुळे शिक्षक रुग्ण सर्वेक्षणासह विद्यार्थ्यांना आॅनलाइन शिकवण्याचे काम करीत आहे. विद्यार्थ्यांना लिंक पाठविली जाते. मात्र, ज्यांच्याकडे आॅनलाइन शिक्षणाची सुविधा नाही, अशांना पुस्तकातील धडे कसे समजावून सांगणार, हा पेच कायम आहे. तसेच कोरोनासुटीत घरात कंटाळलेल्या मुलांकडून पुस्तके वाचली जात आहे की नाही, याची माहिती कशी उपलब्ध होणार, हा प्रश्नअनुत्तरीत आहे.सह्याद्री वाहिनीवरील तिलीमिली कार्यक्रमाद्वारे शिक्षणयासंदर्भात शिक्षण विभागाचे प्रशासकीय अधिकारी जे.जे. तडवी म्हणाले, ज्या विद्यार्थ्यांकडे आॅनलाइन शिक्षणासाठी साधने उपलब्ध नाहीत, अशा विद्यार्थ्यांनी त्यांना दिलेल्या पाठ्यपुस्तकांआधारे शिक्षण घ्यावे. सरकारच्या शिक्षण खात्याकडून आॅनलाइन शिक्षणाच्या विविध लिंक उपलब्ध करून दिल्या आहेत. या लिंक विद्यार्थ्यांना पाठवल्या जातात. तसेच दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर तिलीमिली या शैक्षणिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे दिले जात आहे.मोफत टॅब देण्याची मागणीराज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते दोन वर्षांपूर्वी कल्याणमधील काही शाळांतील विद्यार्थ्यांना टॅबचे मोफत वाटप करण्यात आले होते. आता महाविकास आघाडी सरकारने मनपा शाळेत शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांना टॅबचे मोफत वाटप करावे, अशी मागणी मनसे विद्यार्थी सेनेचे कल्याण शहराध्यक्ष विनोद केणे यांनी केली आहे.
coronavirus: केडीएमसीच्या शाळांतील ४० टक्के विद्यार्थी ऑफलाइन, स्मार्ट फोन, टॅब, पीसी नसल्याने फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2020 2:18 AM