ठाणे : जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येसह मृतांच्या संख्येतही गुरुवारी चिंताजनक वाढ झाली. गेल्या २४ तासांत जिल्ह्यातील रुग्णसंख्या चार हजार ३५० ने वाढले तर १८ जण दगावले. जिल्ह्यात आता तीन लाख २३ हजार ३६१ रुग्णसंख्या असून मृतांची संख्या आजपर्यंत सहा हजार ५१० झाली आहे. ( 4350 corona patients found in Thane district on Thursday)ठाणे शहरात एक हजार ४३२ नवे रुग्ण आढळल्याने येथील रुग्णसंख्या ७९ हजार ३२८ झाली आहे. ठाण्यात पाच जणांचा मृत्यू झाल्यामुळे मृतांची संख्या १ हजार ४५३ एवढी झाली आहे. कल्याण-डोंबिवलीत ८९८ नव्या रुग्णांची वाढ झाली असून तीन मृत्यू झाले. आतापर्यंतची रुग्णसंख्या ८० हजार ७१ असून एक हजार २५९ मृत्यूची नोंंद झाली आहे.उल्हासनगरमध्ये २१८ नवे रुग्ण सापडले असून एक मृत्यू आहे. येथील बाधितांची संख्या १७ हजार ७४ झाली. तर, ३७९ मृतांची नोंद आहे. भिवंडीत ५२ नवे रुग्ण आढळले असून तीन मृत्यू झाले आहेत. आतापर्यंत बाधित सात हजार ७३६ असून मृतांची संख्या ३६३ आहे. मीरा-भाईंदरमध्ये ३५३ नवे रुग्ण आढळले असून दोन मृत्यू झाले आहेत. या शहरांतील बाधितांची संख्या ३० हजार ९८७ असून मृतांची संख्या ८२७ झाली आहे. अंबरनाथमध्ये १७२ नवे रुग्ण आढळले असून एकही मृत्यू नाही. येथे बाधित ११ हजार २८ असून मृत्यू ३१९ झाले आहेत. बदलापूरमध्ये १७७ नव्या रुग्णांची नोंद झाल्यामुळे बाधित १२ हजार १६७ झाले आहेत. या शहरात एकही मृत्यू न झाल्यामुळे मृत्यूची संख्या १२३ कायम आहे. ग्रामीण भागामध्ये ७७ नव्या रुग्णांची वाढ झाली असून एकही मृत्यू नाही. एकूण बाधित २१ हजार ९० असून आतापर्यंत ६०८ मृत्यू नोंदले आहेत.
coronavirus: ठाणे जिल्ह्यात गुरुवारी सापडले कोरोनाचे ४३५० रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2021 4:51 AM