शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, दोन तास प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर सुरक्षित लँडिंग
2
न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा; बुमराहला पुन्हा उप कॅप्टन्सीचा मान
3
MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; 'या' दोन परीक्षांबाबत आयोगाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय!
4
राजेगटाचं अखेर ठरलं! संजीवराजेंच्या नेतृत्वात तुतारी हाती घेणार; रामराजे नक्की काय करणार?
5
अभिनेते सयाजी शिंदे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश, मिळाली मोठी जबाबदारी
6
"माझं केवळ त्याच्या पेन्शनवर प्रेम होतं’’, लव्ह ट्रँगलमधून ३५ वर्षाच्या प्रेयसीने वृद्धाची केली हत्या
7
१२० मिनिटांचा थरार, समोर होता मृत्यू, पण वैमानिकानं दाखवलं प्रसंगावधान, असं उतरवलं विमान 
8
ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी मालिकेला रोहित शर्मा मुकणार? कर्णधार, सलामीवीरासाठी 'ही' नावं चर्चेत
9
महिलांसाठी दिलासादायक बातमी: 'लाडकी बहीण'साठी अर्ज करण्याची मुदत वाढवली, 'ही' असेल शेवटची तारीख!
10
तू ही जरियाँ.. तू ही मंजिल है...! 'अ‍ॅनिमल' फेम तृप्ती डिमरीच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा
11
"काम करणारा भाऊ पाहिजे की, ### बनवणारी...", स्नेहल जगतापांबद्दल गोगावलेंचं वादग्रस्त विधान
12
पोटच्या मुलाला भेटण्यासाठी धडपडणाऱ्या आईची तिच्या पतीनेच भररत्यात गळा चिरून केली हत्या 
13
क्रिकेटच्या खेळातील ४ महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल! नव्या हंगामापासून लागू होणार नवे नियम
14
बोपदेव घाट बलात्कार प्रकरण: पोलिसांनी आतापर्यंत किती आरोपींना अटक केलीये?
15
"उभे राहणार का", सयाजी शिंदेंना निवडणुकीबद्दल प्रश्न; अजित पवारांनी दिलं भारी उत्तर
16
७६०० कोटींच्या ड्रग्ज प्रकरणी ईडीची कारवाई, दिल्ली-मुंबईत छापेमारी, गुन्हा दाखल
17
"...म्हणून मी मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी निघालो?", अजित पवार यांनी केलं स्पष्ट 
18
भारतीय जवानांचा जीव धोक्यात, इस्रायलच्या 'या' निर्णयावर भारताने व्यक्त केली चिंता; जाणून घ्या काय आहे धोका
19
सैनी सरकारचा १५ ऑक्टोबरला शपथविधी, PM मोदींसह भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार!
20
नोएडातील एमिटी युनिव्हर्सिटी परिसरात दोन गटांमध्ये गोळीबार, एक विद्यार्थी जखमी

CoronaVirus: ठाणे जिल्ह्यात ४५५ कोरोना रुग्ण; शहरात दोघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2020 3:13 AM

मीरा-भाईंदरने गाठली शंभरी

ठाणे : ठाणे जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रु ग्णांचा आलेख गेल्या काही दिवसांपासून चढताच असल्याचे दिसत आहे. मंगळवारी ही जिल्ह्यात ३१ रु ग्ण आढळून आले आहेत. तसेच जिल्ह्यात शंभरी गाठणारी मीरा-भाईंदरही ठाणे महापालिकेपाठोपाठची दुसरी महापालिका ठरली आहे. ठामपा क्षेत्रात सोमवार पाठोपाठ मंगळवारीही दोन पॉझिटिव्ह रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील मृतांची संख्या एकूण १७ झाली आहे.ठाणे जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रु ग्णांची एकूण संख्या ही ४५५ इतकी झाली असून मंगळवारी नव्याने जे ३१ रुग्ण सापडले आहेत, त्यामध्ये सर्वाधिक १२ रुग्ण हे मीरा भार्इंदर येथे सापडले आहेत. यामुळे तेथील संख्या ही १०६ इतकी झाली आहे. तर कल्याण डोंबिवलीतही ७ नवे रु ग्ण आढळले असून तेथील रु ग्णांचा आकडा ८५ झाला आहे. यात डोंबिवलीत ४ तर ३ रुग्ण कल्याण रुग्ण मिळून आले आहेत. यामध्ये सहा महिन्यांच्या मुलीसह ६ महिलांचा समावेश आहे. तर एक ६२ वर्षीय पुरु ष आहे. ठामपात ७ आणि नवीमुंबईत ५ नवे रु ग्ण आढळून आले आहेत. ठामपातील रु ग्णांची संख्या ही १५५ झाली आहे तर नवी मुंबई येथील रु ग्णांची संख्या ७४ झाली आहे. त्याच बरोबर भिवंडीत दोन नवे रु ग्ण समोर आल्याने तेथील संख्या ही ५ झाली आहे. तर उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर तसेच ठाणे ग्रामीण येथे मंगळवारी एक ही रु ग्ण आढळून आलेला नाही.१७ रुग्णांचा मृत्यूठाणे महापालिका हद्दीतील ७७ आणि ५८ वर्षीय अशा दोन पॉझिटिव्ह रु ग्ण असलेल्या महिलांचा सोमवारी रात्री आणि मंगळवारी दुपारी मृत्यू झाला आहे. एकीचा मृत्यू जिल्हा रु ग्णालयात तर दुसरीचा मृत्यू खासगी रु ग्णालयात झाला आहे. जिल्हा रु ग्णालयातील महिलेला रविवारी मध्यरात्री उपचारार्थ दाखल केले होते. मंगळवारी दुपारी त्यांचा मृत्यू झाला आहे. तर दुसऱ्या महिलेला १४ एप्रिल रोजी खासगी रु ग्णालयात दाखल केले होते. तेथे त्यांचा सोमवारी रात्री मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १७ रु ग्णांचा मृत्यू झाला आहे.कल्याण-डोंबिवलीत सात नवे रुग्णकल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत मंगळवारी सात नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे पालिका हद्दीत बाधितांची संख्या ८५ झाली आहे. नवीन रुग्णांमध्ये डोंबिवली पश्चिमेतील सहा महिन्यांची बालिका, ३५ वर्षांची महिला, ६२ वर्षांचा वृद्ध, ५३ वर्षांचे गृहस्थ तसेच कल्याण पूर्वेतील २३ वर्षांचा तरुण, ३० वर्षांची आणि ४८ वर्षांची महिला यांचा सामवेश आहे. त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. आतापर्यंत एकूण रुग्णांपैकी २९ रुग्णांना उपचारांती घरी सोडण्यात आले आहे. आजमितीस एकूण ५३ रुग्ण उपचार घेत आहेत.‘त्या’ नागरिकांनी क्वारंटाइन करावे!कल्याण-शहराच्या पश्चिम भागातील रिलायन्स मार्ट येथे काम करणारा इसम १९ एप्रिल रोजी कोरोना पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे या मार्टमध्ये १ ते २० एप्रिल दरम्यान काम करणाºया कर्मचारी व त्याठिकाणी गेलेल्या नागरिकांनी स्वत:ला होम क्वारंटाइन करुन घ्यावे. त्यांना सर्दी, खोकल्याची लक्षणे आढळून आल्यास त्यांनी नजीकच्या तापाच्या दवाखान्यात अथवा महापालिका रुग्णालयात जाऊन तपासणी करावी, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.भिवंडीत दोन रु ग्ण पॉझिटिव्हभिवंडी : शहरातील वेताळपाडा येथील दोन महिलांचे कोरोना अहवाल मंगळवारी पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे भिवंडीत रुग्णांची संख्या शहरात आता पाच, तर ग्रामीणमध्ये तीन अशी संख्या आठवर गेली आहे.शहरातील वेताळपाडा येथे ५३ वर्षीय व्यक्ती मालेगाव येथून भिवंडीत आली. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यावर ठाणे सिव्हिल रु ग्णालयात पाठवले आहे. तसेच कुटुंबातील व्यक्तींना भिवंडी येथील क्वारंटाइन केंद्रात ठेवले आहे. वेताळपाडा परिसरही मनपाने सील केला होता. मालेगावहून आलेल्या व्यक्तीच्या घरातील त्याची ४५ वर्षीय पत्नी व २३ वर्षीय सून अशा दोघींचे अहवाल पॉझिटिव्ह आले,.आतापर्यंत भिवंडीत कोरोनाने शिरकाव केला नव्हता. आता भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात कोरोनाबाधित रु ग्णांची संख्या वाढत आहे.उल्हासनगरमध्ये एक रुग्ण सापडलाउल्हासनगर : मुंबई येथील खासगी रुग्णालयात काम करणाºया उल्हासनगरमधील एकाला लागण झाल्याचे उघड झाले आहे. महापालिका आरोग्य विभागाने त्याच्या पत्नीसह त्याच्या संपर्कात आलेल्या १५ पेक्षा जास्त जणांना विलगीकरण कक्षात ठेवले आहे. तसेच परिसरात तातडीने आरोग्य सर्वेक्षण सुरू केले आहे. या रुग्णाची मुंबई येथे नोंद असल्याची माहिती पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी दिली.देशातील सर्वाधिक घनतेचे शहर कोरोनामुक्त असल्याने सर्वत्र कौतुक होत होते. मात्र, आता मुंबई येथील एका खासगी रुग्णालयात काम करणाºया व्यक्तीला कोरोना झाल्याचे उघड झाले आहे. खबरदारी म्हणून पूर्वेतील एक भाग सील केला असून सर्वेक्षण सुरू केले आहे. तसेच, त्याच्या संपर्कात आलेल्या पत्नीसह १५ पेक्षा जास्त जणांना विलगीकरण केंद्रात ठेवल्याची माहिती पालिका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजा रिजवानी यांनी दिली. या परिसरात फवारणी करून निर्जंतुकीकरण सुरू आहे.. यापूर्वी संसर्ग झालेली एकमेव महिला पूर्ण बरी झाली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस