कल्याण-कल्याणडोंबिवली महापालिका हद्दीत आज कोरोना बाधित नवे 6 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 114 झाली आहे. नव्याने आढळून आलेल्या रुग्णांमध्ये पोलिस व डायलेसिस टेक्नीशियनचा समावेश आहे.मोहने आंबिवली परिसरातील 42 वर्षीय पोलिसाला कोरोनाची लागण झाली आहे. हा पोलिस कर्मचारी मुंबईत कार्यरत आहेत. त्याचबरोबर मुंबईतील खाजगी रुग्णालयात डायलेसिस टेक्नीशियन असलेल्या 38 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. ही महिला डोंबिवली पश्चिम भागात राहते. डायलेसिस रुग्णांना कोरोना चाचणी करुन घेण्यास सरकारने सांगितले आहे. त्यांची चाचणी करण्यात आली होती. आत्ता त्यांची चाचणी करणा-या टेक्नीशियन महिलेस कोरोनाची लागण झाली आहे.डोंबिवली पश्चिमेतील 10 वर्षाचा मुलगा व 45 वर्षीय महिलेला कोराना झाला आहे. त्याचबरोबर डोंबिवली पूर्वेतील 20 वर्षीय तरुणाला आणि कल्याण पश्चिमेतील 26 वर्षीय तरुणीला कोरानाची बाधा झाली आहे. हे चारही रुग्ण कोरोना बाधित रुग्णाच्या सहवासात आल्याने त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. महापालिका हद्दीत आत्तार्पयत आढळून आलेल्या एकूण रुग्णांपैकी 34 रुग्णांना उपचारांती घरी सोडण्यात आले आहे. आजमितीस 76 कोरोनाचे रुग्ण उपचार घेत आहेत.
coronavirus : कल्याण डोंबिवलीत आज सापडले 6 नवे रुग्ण, एकूण कोरोनाबाधितांची संख्या 114 वर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2020 5:45 PM