ठाणे : ठाणे जिल्ह्यात मंगळवारी ६३१ रूग्णंची वाढ झाली. तर, २० जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या १७ हजार ११८ तर, मृतांची संख्या ५५० झाली आहे.ठाणे पालिका हद्दीत मंगळवारी ११२ बाधितांची, तर चार जणांच्या मृत्यूची नोंद झाल्याने, बाधितांची संख्या ५ हजार ४१५, तर मृतांची संख्या १६७ वर गेली आहे. नवी मुंबई महापालिकेत ६३ रुग्णांची, तर तीन जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली.कल्याण, डोंबिवलीमध्ये १५५ रुग्णांची नोंद झाली असून, दोघांचा मृत्यू झाला. येथील बाधितांचा आकडा २ हजार ४३५ तर, मृतांची संख्या ६४ झाली आहे. मीरा भार्इंदरमध्ये १३९ रुग्णांसह एकाच्या मृत्यूची नोंद झाल्याने बाधितांची संख्या १ हजार ७९२ झाली आहे. मृतांची संख्या ८६ झाली आहे. भिवंडी महापालिका हद्दीत ३० रुग्णांची नोंद झाली. तर ५ जणांचा मृत्यू झाला. बाधितांची संख्या ६५० इतकी झाली असून मृतांची संख्या ३० झाली आहे. उल्हासनगरमध्ये २९ रुग्णांची नोंद झाली असून, एकाचा मृत्यू झाला आहे. येथे बाधितांची संख्या ८१६ झाली असून, मृतांची संख्या २८ झाली आहे. अंबरनाथमध्ये ६२ रुग्ण झाल्याने बाधितांची संख्या ८०६, तर मृतांची संख्या २० झाली आहे. बदलापूरमध्ये ७ रुग्ण आढळले. तर दोंघाचा मृत्यू झाला आहे. बाधितांची संख्या ४३१, तर मृतांची संख्या ११ झाली आहे. ठाणे ग्रामीण भागात ३४ रुग्णांची नोंद झाली असून २ जणांचा मृत्यू झाला आहे. येथे बाधितांची संख्या ७१२ असून, मृतांची संख्या २० झाली आहे.वसई-विरारमध्ये तिघांचा मृत्यूवसई-विरार महापालिका हद्दीत मंगळवारी तिघांचा मृत्यू झाला. तसेच, ९७ नवे रुग्ण सापडले. त्यामुळे पालिका हद्दीतील बाधितांची एकूण संख्या १,६८० वर पोहोचली. दिवसभरात ६५ रु ग्ण बरे झाले. आतापर्यंत ८६६ कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच ७५१ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे पालिकेने सांगितले.
CoronaVirus News: ठाणे जिल्ह्यात ६३१ रुग्ण वाढले; २० जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2020 4:30 AM