ठाणे : ठाणे जिल्ह्यात कोरोनाबाधित रु ग्णांच्या संख्येत बुधवारी तब्बल 705 नव्या रुग्णांची भर पडली आहे. परंतु दुसरीकडे आज दिवसभरात जिल्ह्यात तब्बल 45 रुग्णांचा मृत्यु झाल्याचेही दिसून आले आहे. त्यामुळे एकीकडे मृत्युदर कमी असल्याचा दावा करणाऱ्या जिल्हा प्रशासन आणि महापालिकेचे प्रयत्नांवर यामुळे पाणी फेरले आहे. त्यातही भिवंडीत एकाच दिवसात 21 कोरोना बाधीत रुग्णांचा मृत्यु झाला आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत 17 हजार 823 रुग्ण आढळले असून, 595 जणांचा मृत्यु झाला आहे.बुधवारी ठाणे महानगर पालिका हद्दीत 190 बाधितांची तर, आठ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्यामुळे बाधितांची संख्या 5 हजार 605 तर, मृतांची संख्या 175 वर गेली आहे. नवी मुंबई महापालिकेत 128 रु ग्णांची तर, पाच जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे बाधितांची संख्या 4 हजार 189 तर, मृतांची संख्या 129 वर पोहोचली आहे. कल्याण - डोंबिवलीमध्ये 135 रु ग्णांची तर, दोन जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या 2 हजार 570 तर, मृतांची संख्या 66 इतकी झाली आहे. तसेच मीरा भाईंदरमध्ये 90 रु ग्णांसह पाच जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या 1 हजार 882 इतका झाली आहे. तर मृतांची संख्या 91 झाली आहे. भिवंडी महापालिका हद्दीत 37 रु ग्णांची नोंद करण्यात आली असून,आज दिवसभरात तब्बल 21 कोरोना बाधीत रुग्णांच्या मृत्युची विक्रमी नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे आता बाधितांची संख्या 687 इतकी झाली असून मृतांची संख्या 51 झाली आहे.उल्हासनगर 41 रु ग्णांची नोंद करण्यात आली असून येथे आज मृत्युची नोंद झाली नाही, येथे बाधितांची संख्या 857 झाली आहे. तर मृतांची संख्या 28 झाली आहे. अंबरनाथमध्ये 40 रु ग्णाची नोंद करण्यात आली असून एकाचा मृत्यु झाला आहे. त्यामुळे बाधितांची संख्या 846 तर, मृतांची संख्या 21 झाली आहे. बदलापूरमध्ये 17 रु ग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे बाधितांची संख्या 448 झाली आहे. तर, मृतांची संख्या 11 झाली आहे. ठाणो ग्रामीण भागात 27 रु ग्णांची नोंद करण्यात आली असून तीघांचा मृत्यू झाला आहे. येथे बाधितांची संख्या 739 वर गेली आहे. तर, मृतांची संख्या 23 झाली आहे.
coronavirus: ठाणे जिल्ह्यात दिवसभरात सापडले कोरोनाचे ७०५ नवे रुग्ण, 45 रुग्णांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2020 8:17 PM