ठाणे : ठाणे जिल्ह्याचा वाढता पसारा आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन महाराष्ट्राच्या विधी विभागाने ठाणे शहरात आणखी एक कौटुंबिक न्यायालय स्थापन करण्यास परवानगी दिली आहे. हे न्यायालय कार्यान्वित झाल्यास ठाण्यातील कौटुंबिक न्यायालयांची संख्या दोन होणार आहे.ठाण्यातील हे अतिरिक्त कौटुंबिक न्यायालय मनूभाई, वाशी विरुद्ध महाराष्ट्र ही जनहित याचिका क्रमांक १३०/२००४ वर उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार स्थापन करण्यात येणार आहे. नव्या न्यायालयासाठी न्यायाधीश, शिरस्तेदान, सहायक शिरस्तेदार, लघुलेखक, अभिसाक्ष लेखनिक, वाहक हवालदार या न्यायाधीश व साहाय्यभूत कर्मचाऱ्यांसह दोन विवाह समुपदेशी, लघुलेखक , लिपिक आणि दोन शिपाई अशा पदांना विधी विभागाने मान्यता दिली आहे.ठाणे जिल्ह्यात सहा महापालिका, दोन नगरपालिका, दोन नगरपंचायतसह शेकडो ग्रामपंचायत आहेत.
coronavirus: ठाण्यात आणखी एक कौटुंबिक न्यायालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2020 1:48 AM