शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् मोठ्या तोंडाने सांगतात..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
4
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
5
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
6
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
7
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
8
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
9
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
10
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
11
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
12
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
13
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
14
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
15
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
16
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
17
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
18
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
19
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
20
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द

coronavirus: कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांचे ऑडिट करा - म्हस्के

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2020 12:57 AM

Thane News : ठाण्यात कोरोनासोबतच यामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाणदेखील बऱ्याच अंशी कमी झाल्याचे महापालिकेने दिलेल्या आकडेवारीवरून उघड झाले आहे.

ठाणे - ठाण्यात मृत्युदर नियंत्रणात येत असला तरी, आतापर्यंत झालेल्या मृत्यूंचे ऑडिट करण्याचे आदेश महापौर नरेश म्हस्के यांनी प्रशासनाला दिले आहे. कोरोनामुळे मृत झालेल्या प्रत्येक व्यक्तीचे यामध्ये ऑडिट होणार असून मयत झालेली व्यक्ती कधी ॲडमिट झाली होती. त्या व्यक्तीवर कशापद्धतीने उपचार करण्यात आले, याची सर्व माहिती या ऑडिटच्या माध्यमातून घेण्याच्या सूचना महापौरांनी दिल्या आहेत. भविष्यात मृत्युदर आणखी कमी करण्यासाठी या सर्व माहितीचा उपयोग होणार असून यामुळे खाजगी हॉस्पिटलवरदेखील प्रशासनाचा वचक राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.ठाण्यात कोरोनासोबतच यामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाणदेखील बऱ्याच अंशी कमी झाल्याचे महापालिकेने दिलेल्या आकडेवारीवरून उघड झाले आहे. ठाण्यात आतापर्यंतचा सरासरी मृत्युदर हा २.४९ टक्क्यांवर आला असून ऑक्टोबर महिन्यात तर हा मृत्युदर १.०३ टक्क्यांवर आला आहे. मृत्यूचे हेच प्रमाण एप्रिल आणि मे महिन्यात पाच टक्क्यांपेक्षा जास्त होते. मात्र, आतापर्यंत जेवढे मृत्यू कोरोनामुळे झाले आहेत, त्यांचे ऑडिट करण्याचे आदेश महापौरांनी प्रशासनाला दिले आहेत.महापालिका कार्यक्षेत्रात कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांचे ऑडिट करण्यासाठी संबंधितांची समिती गठीत करून यामध्ये महापालिकेच्या आरोग्य विभागातील व प्रशासनातील सक्षम अधिकारी, ठाणे टास्क फोर्सचे अधिकारी, संबंधित हॉस्पिटलचे प्रतिनिधी, ज्या विभागातील रुग्ण आहे त्या विभागातील स्थानिक वैद्यकीय अधिकारी व कोविड आजारातील तज्ज्ञ अधिकारी यांचा समावेश करावा असेही महापाैरांनी  यावेळी सांगितले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे