ठाणे : लॉकडाउनमुळे घरबसल्या लोक कंटाळले आहेत. त्यात कोरोनाच्या वाढत्या प्रदुर्भावामुळे लोक ताणतणावाखाली आहेत. या कंटाळलेल्या लोकांचे मनोरंजन व्हावे आणि त्यांच्या मनावरील ताण हलका व्हावा यासाठी ठाण्यातील गायक किशोर पवार यांनी संगीताच्या माध्यमातूनएक अनोखा उपक्र म हाती घेतला आहे. पोलिसांसोबत प्रत्येक गृहसंकुलाच्या आवारात ते आपल्या सुस्वरात हिंदी, मराठी गीते सादर करून रहिवाशांमध्ये ते जनजागृतीही करीत आहेत. त्यांच्या या उपक्र माचे कौतुक भारतातच नव्हते तर परदेशातही होत आहे.कोरोनावर मात करण्यासाठी सरकारने लॉकडाउन जाहीर केले. या लॉकडाउनमध्ये लोकांना घराबाहेर न पडण्याचे आदेश दिले. घरबसल्या टीव्ही, मोबाइल पाहून लोक कंटाळले आहेत. या कंटाळलेल्या लोकांचा संगीताच्या माध्यमातून मनोरंजन करावे असा प्रस्ताव पवार यांनी चितळसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र राठोड यांच्याकडे दिला होता. त्यांना ही संकल्पना आवडली आणि त्यांनी लगेच याला सकारत्मक प्रतिसाद दिला. वृंदावन येथील शाल्मली सोसायटीमध्ये राहणारे पवार हे एका कंपनीत उच्चपदावर असून ते व्यवसायिक गायक आहेत. त्यांनी अनेक ठिकाणी आपल्या सुरेल आवाजात गाण्यांचे कार्यक्र मही सादर केले आहेत. आपल्या या कलेच्या माध्यमातून लोकांवर आलेले कोरोनाचे दडपण दूर करण्यासाठी हा अनोखा उपक्रम हाती घेतला.गृहसंकुलाच्या आवारात पोलिसांसोबत जाऊन ते आपल्याकडील संगीत साहित्याच्या माध्यमातून किशोरकुमार, रफी यांची गाणी तसेच मराठी गाणी सादर करतात. गृहसंकुलात रहिवासी आपल्या खिडकीत येऊन त्यांच्या गाण्यांचा आस्वाद घेतात. लहान मुले, ज्येष्ठ नागरिकही ऐकायला आवर्जुन येतात. त्यांचे गाणे संपले की खिडकीतूनच टाळ्यांची दादही देतात. कार्यक्र म सुरू होण्यापूर्वी ते घराबाहेर पडू नका, सोशल डिस्टन्सिंग पाळा, आपल्यामुळेच कोरोना पसरतो अशा प्रकारची जागृती ते लोकांमध्ये करतात. शाल्मली, व्होल्टास, पंचवटी, चंदन, वसंत विहार, जस्मिन टॉवर, सिद्धांचाल, गार्डन एन्क्लेव्ह, निहारिका, ईडन वूड, लोकपूरम, म्हाडा वसाहत , गावंड बाग, नीळकंठ ग्रीन, शुभारंभ अशा अनेक सोसायट्यांध्ये त्यांनी उपक्र म राबविला असून तो सुरूच आहे. संगीतामुळे मन प्रसन्न होते. त्यामुळे मी हा उपक्र म हाती घेतला. लोकांकडून मला चांगली दाद मिळत आहे असे पवार यांनी सांगितले.
CoronaVirus: गाण्यांद्वारे मनोरंजनासह जनजागृती; सर्व स्तरांतून होतेय कौतुक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2020 11:49 PM