शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata News Live: रतन टाटांचे पार्थिव वरळीच्या स्मशानभूमीत दाखल, थोड्या वेळात अंत्यसंस्कार
2
"या नेत्यांमुळे काँग्रेस हरयाणात हरली’’, पराभवाचं खापर फोडत संतप्त राहुल गांधींनी मांडलं परखड मत 
3
उद्धव ठाकरेंसोबतच्या बैठकीत काय चर्चा झाली?; रविकांत तुपकरांनी सांगितली रणनीती
4
कमाल! २ वेळा अपयश आलं, निराश झाली पण हरली नाही...; IPS अधिकारी होण्याचं स्वप्न केलं पूर्ण
5
मदरश्यांमधील शिक्षकांच्या मानधनात वाढ, खासगी विद्यापीठांना मंजुरी, राज्य मंत्रिमंडळात निर्णयांचा धडाका
6
Video: चेंडू हवेत जाताच हार्दिक पांड्या तुफान धावत सुटला, एका हाताने टिपला भन्नाट कॅच
7
सणासुदीच्या काळात मोदी सरकारची राज्यांना मोठी भेट, 1.78 लाख कोटी रुपये जारी...
8
"रतन टाटांसारख्या व्यक्तीला खरं तर हयात असतानाच 'भारतरत्न'ने सन्मानित करायला हवं होतं"
9
"या पराभवाला खूप गंभीरपणे..."; हरयाणा विधानसभा निकालावर अशोक गेहलोत यांचं मोठं विधान
10
२० वर्षांपासून असलेल्या नोकराने घात केला; भाजपा मंत्र्याच्या ५० लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारला
11
आळंदीची लेक ते महाराष्ट्राची लोकप्रिय गायिका; जीवनातील अध्यात्माचं महत्त्व, महिला सुरक्षेवरही कार्तिकी स्पष्टच बोलली..
12
PAK vs ENG : मुल्तानमध्ये इंग्लंड 'सुल्तान'! ऐतिहासिक आकडा अन् विश्वविक्रम; भारताचा विक्रम मोडला
13
रिस्क घ्यायची नसेल तर 'या' सरकारी स्कीममध्ये गुंतवा पैसा; रिटायरमेंटपर्यंत व्हाल २,२६,९७,८५७ रुपयांचे मालक
14
इंग्लंड-पाक नव्हे भारत-श्रीलंका लढतीत सेट झालाय कसोटीतील सर्वोच्च धावसंख्येचा वर्ल्ड रेकॉर्ड
15
रतन टाटांसह त्यांच्या भावानेही लग्न केले नाही; सावत्र भाऊ सांभाळतो व्यवसाय, कुटुंबात कोण..?
16
Dussehra 2024: दसर्‍याला आठवणीने करा 'हे' एक काम; वास्तुमध्ये सदैव राहील सुख, संपत्ती, समाधान!
17
PAK vs ENG Live : इंग्लंड ७ बाद ८२३! पाकिस्तानी चाहत्यांना वेदना देणारी 'कसोटी', हॅरी ब्रूकच्या ३१७ धावा
18
एक पंखा, दोन बल्ब आणि टीव्ही..., विजेचं बिल आलं १.९ लाख रुपये, त्रस्त युवकानं उचललं टोकाचं पाऊल  
19
टाटांची जादू : टाटांच्या 'या' शेअरनं १ लाखांचे केले ₹३५ कोटी; गुंतवणूकदार झाले कोट्यधीश
20
सर्वाधिक १० श्रीमंत उमेदवारांमध्ये ७ पुरुष, ३ महिला; सर्व पुरुष हरले, महिला जिंकल्या

coronavirus: गणेशमूर्ती विसर्जनासाठी भिवंडी मनपा करणार मोबाईल ऍपचा वापर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2020 6:16 PM

विसर्जन घाटावर होणारी गर्दी टाळण्यासाठी यंदा मोबाईल ऍप चा वापर केला जाणार असून गणेशभक्तांना ऑनलाईन दिलेल्या वेळेतच विसर्जन करता येणार आहे अशी माहिती महापौर प्रतिभा विलास पाटील यांनी दिली आहे.

भिवंडी  - सध्या सुरू असलेल्या कोरोना संक्रमण काळात गणेशोत्सव साजरा करण्यासाठी शासनाने नियम अटी लागू केल्या असतानाच भिवंडी महानगरपालिका गणेशोत्सव उत्सव काळात सर्व यंत्रणे सह सज्ज असून विसर्जन घाटावर होणारी गर्दी टाळण्यासाठी यंदा मोबाईल ऍप चा वापर केला जाणार असून गणेशभक्तांना ऑनलाईन दिलेल्या वेळेतच विसर्जन करता येणार आहे अशी माहिती महापौर प्रतिभा विलास पाटील यांनी दिली आहे. गणेशोत्सव साजरा करणे बाबत भिवंडी पोलिस विभाग , सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पदाधिकारी यांची संयुक्त बैठक सोमवारी पार पाडली असून यावेळी महापौर प्रतिभा विलास पाटील व आयुक्त डॉ पंकज आशिया यांनी जनतेस गर्दी न करण्याचे आवाहन देखील केले आहे. यावेळी पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे,अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे , स्थायी समिती सभापती हलीम अन्सारी, विरोधी पक्ष नेते यशवंत टावरे , सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष मदन भोई व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.भिवंडी शहरातील घरगुती गणेश मुर्तीची उंची 2 फुटापर्यंत तर सार्वजनिक गणेशोत्सवासाठी चार फुट उंच मुर्तीची मर्यादा ठेवण्यात आली आहे.तर गणेश आगमन व विसर्जन मिरवणूक गणेशभक्तांना काढता येणार नसून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मंडपामध्ये थर्मल स्कॅनर आणि पल्स ॲाक्सीमीटरच्या साहाय्याने तपासणी बंधनकारक राहणार असल्याचे सांगत मंडपातील प्रत्येकाची नोंद ठेवण्याचे बंधन सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना घातले असून मंडपामध्ये वावरणाऱ्या प्रत्येकाने मास्क लावणे बंधनकारक असल्याचे महापौर प्रतिभा विलास पाटील यांनी स्पष्ट केले .कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर घरगुती तसेच सार्वजनिक गणेशोत्सवासाठी राज्य शासनाने जाहिर केलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या आधारे भिवंडी महानगरपालिकेने गणेशोत्सवासाठी आपली मार्गदर्शक नियमावली तयार केली असून गणेश आगमन आणि विसर्जनाच्यावेळी जास्तीत जास्त पाच लोक असावेत, गणपतीची सजावट पर्यावरणपूरक तसेच कमीत कमी असावी, राज्य शासना च्या नियमाप्रमाणे प्लास्टीक आणि थर्माकोलचा वापर करू नये, गणपतीच्या दर्शनासाठी, तीर्थप्रसाद व महाप्रसादासाठी गृहभेटी टाळाव्यात, विसर्जनस्थळी नागरिकांना कमीत कमी वेळ थांबता यावे यासाठी विसर्जन समयी निघताना गणेशभक्तांनी घरीच श्रीगणेशाची आरती करून घ्यावी . शक्यतो घराच्या आवारात, इमारतीच्या परिसरात विसर्जन करावे . विसर्जन घाटावर गणपतीचे विसर्जन करण्यात येत असताना महत्वपूर्ण सूचनांचे पालन करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.

मोठ्या गृहसंकुलाच्या ठिकाणी त्यांच्या संकुलातील गणेश मुर्तीचे विसर्जन सिंटेक्सच्या मोठ्या टाकीमध्ये करण्याची दक्षता घेण्याबरोबरच निर्माल्य स्वतंत्रपणे जमा करून विल्हेवाटीसाठी महापालिकेकडे सुपूर्द करण्यात यावे असे स्पष्ट करून भिवंडी महानगरपालिकेने नागरिकांनी शाडूच्या मातीची गणेशमुर्ती पुजावी व घरच्या घरी बादलीमध्ये विसर्जन करावे अथवा पीओपी गणपती मुर्ती बाबत विसर्जनासाठी अमोनिया बायकार्बोनेटचा वापर करावा असे आवाहन केले आहे.सार्वजनिक गणेशोत्सवासाठी नियमावली तयार करताना महापालिकेने कोरोना कोविडच्या पार्श्वभूमीवर सार्जनिक गणपतीची प्रतिष्ठापना करणे टाळावे असे आवाहन केले आहे.सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने गणेश दर्शनासाठी शक्यतो केबल नेटवर्क, ॲानलाईन सुविधा अथवा फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून दर्शनाची व्यवस्था करावी असे स्पष्ट करून मिरवणूक, अन्नदान, महाप्रसाद आदी कार्यक्रमाना गर्दी टाळण्यासाठी मनाई करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे गर्दी आकर्षित होईल अशा प्रकारच्या जाहिराती प्रदर्शित न करता आरोग्यविषयक तसेच सामाजिक संदेश असणाऱ्या जाहिराती प्रदर्शित करण्यात याव्यात असेही महापालिकेच्या वतीने आयुक्त डॉ पंकज आशिया यांनी स्पष्ट केले आहे.सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडपाची उंचीही 12 फुटांपेक्षा जास्त असणार नाही याची दक्षता घेण्याबरोबरच त्यासाठी आवश्यक ती परवानगी घेण्याची जबाबदारी मंडळांची राहणार आहे. त्याचबरोबर नागरिकांनी महापालिकेस सहकार्य करण्याचे आवाहन महापालिकेच्या वतीने केले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसbhiwandiभिवंडी