शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

CoronaVirus News: "आयुक्तांची बदली करण्याऐवजी दोन्ही मंत्र्यांना पदांवरून दूर करा"

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2020 3:42 PM

भाजप आणि मनसे झाली आक्रमक; अपयश झाकण्यासाठी आयुक्तांची बदली केल्या आरोप

ठाणे  : ठाणे  महापालिकेचे आयुक्त विजय सिंघल यांच्या बदलीवरुन आता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. कोरोनाचे अपयश झाकण्यासाठीच आयुक्तांची बदली करण्यात आल्याचा आरोप आता भाजप आणि मनसेने केले आहे. वास्तविक पाहता हे नगरविकास विभागाचे अपयश असून त्यांनी ही जबाबदारी स्विकारणे  अपेक्षित आहे. तसेच ठाण्यातील दोनही मंत्र्यांचे हे अपयश असून त्यांचे मंत्रीपद काढावे असा सुर आता या दोनही पक्षांनी लावला आहे.ठाणे शहरासह जिल्ह्यातील इतर महापालिका भागातही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यानुसार उल्हासनगर आणि मिराभाईंदर महापालिकेच्या आयुक्तांची बदली करण्यात आली. तर रात्री उशिरा ठाणे महापालिकेचे आयुक्त विजय सिंघल यांचीही बदली करण्यात आली. कोरोनाला रोखण्यात अपयशी ठरल्याने त्यांची बदली करण्यात आल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. परंतु आता यावरुन राजकारण चांगलेच तापू लागले आहे. भाजप आणि मनसेने या बदलीच्या निमित्ताने यात उडी घेतली आहे.  कोरोना बाधीत रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे मुंबईत आयुक्त बदललेत, तर मग ठाण्यात पालकमंत्नी बदलणार का?, या भाजपा नेते आशिष शेलार यांच्या सवालाची दखल घेऊन, राज्य सरकारने ठाणो महापालिकेचे आयुक्त विजय सिंघल यांची तडकाफडकी बदली करून, पालकमंत्री एकनाथ शिंदे व गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना मोकळे सोडले, अशी टीका भाजपचे जिल्हाध्यक्ष व आमदार निरंजन वसंत डावखरे यांनी ट्विटरद्वारे केली आहे. ठाणो महापालिकेचे आयुक्त विजय सिंघल यांची अवघ्या 3 महिने 3 दिवसांत ठाण्यातून बदली करण्यात आली. ठाणो महापालिका क्षेत्रत कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला आयुक्तांनाच जबाबदार धरण्यात आले. परंतु त्यांच्या बरोबर यामध्ये ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड हे देखील तितकेच जबाबदार असल्याचा आरोप डावखरे यांनी केला आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी-पाचपाखाडी व गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या कळवा-मुंब्रा मतदारसंघात कोरोनाचे मोठ्या संख्येने रु ग्ण आहेत. महापालिकेकडून मुंब्रा येथील मृतांची नोंद कमी केली जाते. आपल्या स्वत:च्या मतदारसंघात कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यात दोन्ही मंत्री अपयशी ठरले. मात्र, त्यांना महाविकास आघाडी सरकारने अभय का दिले असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.दुसरीकडे त्यांच्याच पक्षातील नगरसेवक  नारायण पवार यांनी देखील या दोनही मंत्र्यांवर टिका करतांना हे पालिकेला दोष देताना या दोघांचीही जबाबदारी तितकीच महत्वाची होती. परंतु आपले अपयश झाकण्यासाठीच आयुक्तांची बदली करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. महापालिकेतील काही विशिष्ट अधिका:यांच्या लॉबीच्या हितसंबंधांचा फटका देखील मावळत्या आयुक्तांना बसल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला.भाजप पाठोपाठ मनसेने देखील या बदलीवरुन सत्ताधाऱ्यांवर चांगलेच तोंडसुख घेतले आहे. मनसेचे ठाणे, पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी आयुक्तांच्या बदली आड आपले अपयश झाकण्याचा सत्तधाऱ्यांचा प्रयत्न असल्याची टिका केली आहे. जिल्ह्यातील चार आयुक्तांच्या मंगळवारी बदली करण्यात आल्या आहेत. सरकार फेल झाल्याने कोणाच्या तरी माथी हे अपयश मारायचे म्हणून या चार बदल्या करण्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. आयुक्त अपयशी ठरत असेल तर संपूर्ण प्रशासन त्याला जबाबदार असतात. याला जबाबदार म्हणून ठाणे  जिल्ह्याचे पालकमंत्री देखील असून मुख्यमंत्र्यांनी देखील त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी त्यांनी केली. नवीन रुग्णालयात साहित्यांचा तुटवडा असे असतांना हे अपयश हे या नेत्यांचे आहे. प्रशासनाच्या माथी मारुन जमणार नाही तर हे अपयश सरकारचे आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा अशी मागणीही त्यांनी केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJitendra Awhadजितेंद्र आव्हाडShiv SenaशिवसेनाBJPभाजपाMNSमनसेEknath Shindeएकनाथ शिंदे