शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
2
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
3
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
4
घाबरू नका,'टायगर अभी जिंदा है', समरजित घाटगेंचा कार्यकर्त्यांना दिलासा
5
मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...
6
धक्कादायक! भाड्याचं घर, परदेशी कनेक्शन, १९० कोटींची फसवणूक; सायबर गुन्हेगारांचा पर्दाफाश
7
आता रॉकेट लॉन्चरही उडवू शकणार नाही 'पप्पू' यांची कार; मित्राने दिली खास गिफ्ट
8
Fengal Cyclone: फेंगल चक्रीवादळाचा बसणार तडाखा! कोणत्या राज्यांना रेड अलर्ट?
9
भारीच! आई अंगणवाडी सेविका, मुलगा झाला DSP; नातेवाईकांनी टोमणे मारले पण सोडली नाही जिद्द
10
शुबमन गिलला डेट करण्याची बॉलिवूड अभिनेत्रीची इच्छा, म्हणते- "तो खरंच खूप क्यूट..."
11
Adani Group News Update: 'गौतम अदानी, सागर अदानी, विनीत जैन यांच्यावर अमेरिकेत लाचखोरीचा आरोप नाही,' अदानी समूहाचं स्पष्टीकरण
12
"ICU वॉर्डमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुलं होती..."; रुग्णालयातील आगीच्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा
13
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
14
SIP की FD,पैशांची गुंतवणूक कुठे करायची? फायदा-तोट्याचे गणित समजून घ्या
15
आता १६ वर्षांखालील मुलांना फेसबूक, इन्स्टावर अकाऊंट उघडता येणार नाही, या देशाने घातली बंदी
16
माझा पराभव विरोधकांकडून नव्हे तर...; निकालानंतर राजेंद्र राऊतांनी बोलून दाखवली मनातील सल  
17
NTPC Green IPO Listing Today: एनटीपीसी ग्रीनचं निराशाजनक लिस्टिंग; मात्र नंतर स्टॉक सुस्साट, पहिल्याच दिवशी अपर सर्किट
18
मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या
19
अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर पुन्हा एकदा प्रेमात पडली मलायका?, मिस्ट्री मॅनसोबतचा व्हिडीओ व्हायरल
20
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी

coronavirus: लॉकडाऊनमुळे कर्ज न काढता झालेल्या लग्नामुळे वधूपिते आनंदी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2020 4:11 AM

लॉकडाउनमध्ये कार्य उरकल्याने दिलासा, मंडप, पंगती, रोषणाईवरील खर्च वाचला

- कुमार बडदे मुंब्रा : लग्न म्हणजे बँडबाजा, बारात, पंगती, मानपान, कपडेलत्ते, दागदागिने... कोरोनामुळे घोषित लॉकडाउनच्या काळात लग्नाचे पक्के केलेले मुहूर्त चुकू नये, याकरिता काही वधूपित्यांनी आग्रह धरला आणि कर्जाच्या मोठ्या ओझ्याच्या संकटातून मुक्तता होत त्यांच्या कन्येचे दोनाचे चार हात झाले. त्यामुळे अशा अडल्यानडल्या वधूपित्यांकरिता कोरोना वरदान ठरला आहे.लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्प्यात सारे असून अनेकजण बेरोजगारी, वेतनकपात वगैरे विविध समस्यांना सामोरे जात आहेत. देशभरात लक्षावधी मजूर हजारो किमी पायपीट करीत आहेत. त्यामुळे या साऱ्यांकरिता कोरोना हे भीषण संकट ठरणे स्वाभाविक आहे. परंतु लॉकडाउनच्या काळात मुलीचे लग्न उरकून घेण्याचा आग्रह धरणाºया धूर्त पित्यांची मोठ्या प्रमाणावर खर्चातून सुटका  झाली आहे. जेथे दोन्हीकडचा खर्च वधूच्या मंडळींवर सोडला गेला होता, तेथे वधूपिता मनातून खूश झाला आहे तर जेथे खर्च निम्मा वाटून घेण्याचे ठरले तेथे दोन्हीकडचे यजमान बचतीमुळे आनंदी आहेत.लॉकडाउन पुढेपुढे जाण्याची शक्यता असल्याने यंदाचे लग्नमुहूर्त संपत आले आहेत. ज्या मुलामुलींकरिता लागलीच पुन्हा वर्ष-दोन वर्षे लग्नयोग नाही त्यांच्या कुटुंबापुढे पेच निर्माण झाला होता. गर्दी न जमवता सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करण्याच्या बंधनाचा स्वीकार करुन लग्न उरकून घेण्याचा पर्याय त्यांनी निवडला. अर्थात आपले लग्न धूमधडाक्यात होईल, या अपेक्षेने मनोरथ रचलेल्या नियोजित वधू-वराचा हाताच्या बोटावर मोजता येईल इतक्या मंडळींच्या उपस्थितीत झालेल्या लग्नाने हिरमोड झाला. अशा प्रकारे अत्यंत साधेपणाने झालेल्या मुंब्रा येथील लग्नांचे काही व्हिडीओ समाजमाध्यमावर व्हायरलही झाले आहेत.सभागृह, मानसन्मान, पंगती, मंडप, डेकोरेशन, रोषणाई, फटाक्यांची आतषबाजी यावरील खर्चाला आपसूक आळा बसल्याने या खर्चासाठी काढाव्या लागणाºया कर्जामधून वधूपित्याची सुटका झाली आहे.मुलीची लग्न केल्यावर निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेले अनेक वधूपिता लग्नाकरिता काढलेले कर्ज मरेपर्यंत फेडत राहतात किंवा आपला प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅच्युइटीची रक्कम लग्नात उधळून कफल्लक होतात.लॉकडाउनच्या दरम्यान आम्ही आमच्या मुलीचा लग्न समारंभ उरकून घेतला. मुलीचे लग्न या संकटाच्या काळातही ठरलेल्या मुहूर्तावर झाल्याने आम्ही आनंदीत आहोत. मुलीच्या डोक्यावर अक्षता पडल्याने एका मोठ्या कर्तव्यातून मोकळे झालो.-अनिल आणि सुवर्णा गोडवे,वधूपिता व माता

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणेmarriageलग्न