भिवंडी : परप्रांतीय कामगारांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी विशेष श्रमिक गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. भिवंडीतून गोरखपूर, जयपूर येथील कामगारांना घेऊन जाणारी श्रमिक गाडी रवाना झाल्यानंतर पाटणापर्यंत विशेष गाडी सोडण्याचे नियोजन मंगळवारी सुरू असून त्यासाठी पहाटेपासून पोलिसांनी नेमून दिलेल्या ठिकाणी एकत्रित आलेल्या मजुरांची नोंदणी पूर्ण झाल्याने काहींना माघारी पाठविले. त्यामुळे कामतघर रस्त्यावर कामगारांनी संताप व्यक्त करत जोरदार घोषणाबाजी केली.
भिवंडीत अडकून पडलेल्या बिहारमधील कामगारांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी पाटणापर्यंत श्रमिक गाडी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी पोलीस उपायुक्त परिमंडळ क्षेत्रातील सहा पोलीस ठाणे हद्दीत निश्चित केलेल्या ठिकाणी नावनोंदणी सुरू केली असता दोन दिवसांत हजारो नागरिकांनी नोंदणी केली. त्यानंतर नावनोंदणी केलेल्या नागरिकांना सकाळी ७ वाजता केंद्रांवर बोलविले त्या ठिकाणी पहाटेपासूनच कामगारांनी गावी जाण्यासाठी गर्दी केली. दरम्यान, पोलीस अधिकाऱ्यांकडून अवघ्या काही तासांत रेल्वे प्रवासासाठी आवश्यक नोंदणी झाल्याने अन्य कामगारांना पोलिसांनी माघारी पाठविले.
त्यावर या कामगारांनी संताप व्यक्त करत पोलीस व बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आम्हाला सकाळी बोलविल्याने आम्ही मुलाबाळांसह या ठिकाणी गावी जाण्याच्या प्रतीक्षेत बसलो होतो; परंतु पोलिसांनी आम्हाला हुसकावून लावल्याने आमचा हिरमोड झाला, अशा प्रतिक्रि या मजुरांनी दिल्या.भिवंडीतून जयपूरसाठी ट्रेन रवानालॉकडाउनमुळे अडकून पडलेल्या कामगारांना त्यांच्या गावी पोहोचवण्यासाठी भिवंडी रोड स्थानकातून श्रमिक एक्स्प्रेस सोडण्यात येत आहेत. दोन दिवसांपूर्वी गोरखपूरसाठी विशेष ट्रेन रवाना झाली होती. त्यापाठोपाठ सोमवारी रात्री ९ वाजून ५५ मिनिटांनी दुसरी विशेष ट्रेन जयपूरसाठी रवाना झाली.जयपूरच्या ट्रेनमध्ये एकूण एक हजार २११ कामगार प्रवासी रवाना झाले. त्यांच्याकडून तिकिटाचे ५५५ रु पये भाडे घेण्यात आले. त्याचबरोबर त्यांच्या जेवणाची व्यवस्था, सेनिटायझर, मास्क इत्यादींची सोय ट्रेनमध्ये करण्यात आली होती. दरम्यान, आपल्या गावी जाण्यासाठी ट्रेन मिळाली याचा आनंद प्रत्येक प्रवासी कामगाराच्या चेहºयावर दिसत होता. ठाण्याचे सहपोलीस आयुक्त अनिल कुंभारे यांनी या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला, तर उपस्थित पोलीस, महापालिका, महसूल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी टाळ्या वाजवत कामगारांना निरोप दिला.