- नितिन पंडीत
भिवंडी - कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करताना पुन्हा एकदा नागरिकांवर निर्बंध लावण्यास सुरवात केली.त्यानुसार दिवसा जमावबंदी रात्री संचारबंदी असताना भिवंडी शहरात कोरोना नियमावली कडे नागरीक सर्रास पणे दुर्लक्ष करीत तोंडावर मास्क न लावता सामाजिक अंतर न बाळगता वावरत आहेत.
भिवंडी शहरातील तिनबत्ती बाजार पेठेत मंगळवार हा बाजार चा दिवस गृहीत धरून बाजारात खरेदी साठी नागरीकांची सायंकाळी तुफान गर्दी झाली होती.विशेषतः साई बाबा मार्केट मध्ये खरेदी साठी आलेल्या नागरीकांच्या तोंडावर मास्क दिसून येत नव्हते तर त्या ठिकाणी दुकानदारां सह ग्राहकांनी गर्दी केल्याने सोशल डिस्टेसिंग चा फज्जा उडाला होता.अशा परिस्थितीत त्याला अटकाव करण्यसाठी पालिका व पोलीस प्रशासन यांचे सोयीस्कर दुर्लक्ष दिसून आले .