ठाणे : शहरातील ९४ पेक्षा अधिक सोसायट्यांसह ३७ झोपडपट्ट्यांचा समावेश महापालिकेने कंटेन्मेंट झोनमध्ये केला आहे. ज्या ठिकाणी हे झोन जाहीर केले आहेत, त्या ठिकाणच्या चारही दिशांना सीमा निश्चित करून बॅरिकेट्स लावले आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता एकही व्यक्ती या बॅरिकेट्सच्या आतमध्ये किंवा बाहेर जाणार नाही याची दक्षता प्रशासनाने घेतली आहे. याशिवाय या झोनमध्ये लॉकडाउनचे नियमदेखील कडक करण्याचे परिपत्रक आयुक्त विजय सिंघल यांनी काढले आहे.
ठाण्यात कोरोना रुग्णांचा आकडा हा ४०० च्या घरात गेला असून यामुळे प्रशासन अधिक सतर्क झाले आहे. सोमवारी आयुक्तांनी एक परिपत्रक काढून कंटेन्मेंट झोनच्या आतमध्ये आणि बाहेर लॉकडाउनचे कशाप्रकारे पालन झाले पाहिजे यासंदर्भात महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. कंटेन्मेंट झोनमध्ये नागरिकांच्या येण्या-जाण्यावर प्रतिबंध आहे. यापुढे या झोनमध्ये येत असलेल्या इमारती, चाळी आणि काही परिसर शोधून चारही दिशेला बॅरिकेट्स लावल्याची माहिती सूत्रांनी दिली. पोलिसांनीदेखील हे परिसर निश्चित केले असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. आयुक्तांच्या म्हणण्यानुसार ज्या भागात या सीमा निश्चित करून बॅरिकेट्स टाकले आहेत, तो भाग पूर्णपणे सील केला असून केवळ आवश्यक गरजांची दुकाने निश्चित वेळेत उघडण्यास परवानगी आहे.प्रभाग समितीनिहाय कंटेन्मेंट झोनमधील इमारतीएकूण सोसायटी - ९४ एकूण एरिया / झोपडपट्टी - ३७कळवा प्रभाग समितीसोसायटी -०६एरिया / झोपडपट्टी - ०४मुंब्रा प्रभाग समितीसोसायटी - १८एरिया / झोपडपट्टी - संतोष नगर, शमशाद नगरदिवा प्रभाग समितीसोसायटी - ०४एरिया / झोपडपट्टी -०१नौपाडा प्रभाग समिती : सोसायटी - १६एरिया / झोपडपट्टी - ०७महत्त्वाचे एरिया - लक्ष्मीवाडी (चेंदणी कोळीवाडा) , नाखवा चाळ, सिल्व्हर पोलीस लाईन, आनंदनगर (गांधीनगर रोड), साठेवाडी, नागसेन नगरक्रिक रोड )उथळसर प्रभाग समितीसोसायटी - १०एरिया/ झोपडपट्टी ०१ (रुणवालनगर,कोलबाड )माजिवडा -मानपाडा प्रभाग समितीसोसायटी - ०५महत्वाच्या सोसायटी - पुराणिक कॅपिटल, (वडवली ), इरॉस सोसायटी ,एरिया / झोपडपट्टी ओम साई चाळ,किंग काँगनगर (डोंगरीपाडा )वर्तक नगर प्रभाग समिती -सोसायटी - ०५, प्रेस्टिज रेसिडेन्सीएरिया/ झोपडपट्टी - ०३ कदम चाळ (कापूरबावडी ), एमएमआरडीए पुनर्विकास इमारत (खेवरा सर्कल), चिरागनगर