ठाणे - ठाणे जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. काल मंगळवारी कोरोनाचे 1359 रूग्ण संख्या आढळल्यानंतर आज बुधवारी झपाट्याने वाढ होत 1804 रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात आता 2 लाख 80 हजार 732 रुग्णांची नोंद झाली. दिवसभरात 6 रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यातील मृतांची संख्या 6 हजार 355 झाली आहे. (Corona eruption in Thane district, 1804 patients found in a day) ठाणे शहर परिसरात 493 रुग्ण आढळल्याने येथील रुग्ण संख्या आता 66 हजार 711 झाली आहे. शहरात दोघांच्या मृत्यूची नोंद झाली असून मृत्यूची संख्या 1 हजार 416 झाली आहे. कल्याण - डोंबिवलीत 593 रुग्णांची वाढ झाली असून एकाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. नवी मुंबईत 318 रुग्णांची वाढ झाली असून आजची मृत्यूसंख्या तीन आहे. उल्हासनगरमध्ये 71 रुग्ण सापडले असून एकही मृत्यू झाला नाही.भिवंडीत 22 बाधीत असून एकही मृत्यूची नोंद नाही. मीरा भाईंदरमध्ये 83 रुग्ण आढळले असून एकाही मृत्यूची नोंद नाही. अंबरनाथमध्ये 46 रुग्ण आढळले असून एकही मृत्यू नाही. बदलापूरमध्ये 84 रुग्णांची नोंद झाली असून एकाही मृत्यूची नोंद नाही. ठाणे ग्रामीणमध्ये 94 रुग्णांची वाढ झाली असून एकाही मृत्यूची नोंद नाही. आता बाधीत 20 हजार 143 आणि आतापर्यंत 599 मृत्यूंची नोंद आहे.
coronavirus: ठाणे जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट, दिवसभरात सापडले तब्बल १८०४ रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2021 8:19 PM