शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
2
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
3
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
4
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
5
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
7
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
8
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
9
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
10
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

coronavirus: ठाणे शहरात कोरोनाची साथ आली आटोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2021 2:23 AM

coronavirus: कोरोनाने मार्चमध्ये २०२० पासून हाहाकार उडवून दिला होता. ठाणे मनपा हद्दीत एप्रिल, मे महिन्यापासून कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने झालेली वाढ व होणारे मृत्यू, यामुळे आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली होती. मात्र, मागील दोन ते तीन महिन्यांपासून रुग्णसंख्या आटोक्यात येत आहे.

ठाणे -  कोरोनाने मार्चमध्ये २०२० पासून हाहाकार उडवून दिला होता. ठाणे मनपा हद्दीत एप्रिल, मे महिन्यापासून कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने झालेली वाढ व होणारे मृत्यू, यामुळे आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली होती. मात्र, मागील दोन ते तीन महिन्यांपासून रुग्णसंख्या आटोक्यात येत आहे. रुग्णदुपटीचा कालावधी ६०२ दिवसांवर गेल्याने नागरिकांसाठी ही आनंदाची बाब आहे. दररोज आढळणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही आता ३०० ते २५० वरून थेट १००च्या आत आले असून ते ०.१३ टक्के झाले आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.५९ टक्क्यांवर पोहोचले आहे. तर, मृत्युदर २.२२ टक्क्यांवर आला आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठामपा प्रशासन व आरोग्य विभागाकडून विविध उपाययोजना केल्या जात आक्त. झोपडपट्ट्यांमध्ये औषध व धूरफवारणी, सार्वजनिक शौचालयांचे निर्जंतुकीकरण करणे आदी उपाययोजना केल्या जात आहेत. बाधित रुग्ण आढळल्यानंतर त्या परिसराचे निर्जंतुकीकरण तसेच त्याच्या घरातील सदस्यांना क्वारंटाइन करणे आदी उपाययोजना करण्यात येत आहेत. तसेच काही महिन्यांपासून नागरिकांच्या कोरोना चाचण्याही करण्यात येत आहेत. त्यामुळे दररोज आढळणाऱ्या रुग्णांच्या संख्येत ३०० ते ४०० वरून आता १००पर्यंत घट झाली आहे. मनपा क्षेत्रात आतापर्यंत १० लाख ३६१ नागरिकांच्या कोरोना चाचण्या झाल्या असून, त्यापैकी ५८ हजार ५५० कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यापैकी ५६ हजार ५५६ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. त्याचे प्रमाण ९६.५९ टक्के इतके आहे. तर, शहरात आतापर्यंत एक हजार ३०१ रुग्ण मृत पावले असून, त्याचे प्रमाण २.२२ टक्के इतके आहे. शहरात सध्या केवळ ६९३ कोरोनाबाधित रुग्ण असून, त्यांच्यावर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. यामध्ये २७६ रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून २६७ रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत, असून नऊ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. दुसरीकडे ३२ रुग्ण होम क्वारंटाइन तर, २१ रुग्ण हे मनपा हद्दीबाहेरील रुग्णालयात दाखल असल्याची माहिती मनपाच्या आरोग्य विभागाने दिली.  

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे