- सुरेश लोखंडेठाणे : 'मिशन बिगेन अगेन'च्या आदेशास अनुसरून जिल्ह्यातील विविध कंपन्या, आस्थापना सुरू करण्यात आलेल्या आहेत. त्यांना लागणारा पक्का माल व रॉ मटेरियल साठवणारी हजारो गोदामे (गोडाऊन) जिल्ह्यात कार्यरत आहेत. या गोदामांपासून उद्भवणाºया संभाव्य संकटावर वेळीच मात करणे अपेक्षित आहे. त्यास अनुसरून कोरोनाच्या दृष्टीने या गोदामांचे तत्काळ निर्जंतुकीकरण करण्याचे आदेश ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी शुक्रवारी जारी केले आहेत. या आदेशास गांभीर्याने न घेतल्यास कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. यामुळे खाजगी आस्थापना व कंपन्यांचे धाबे दणाणले आहेत.जिल्ह्यात भिवंडी, अंबरनाथ, कल्याण, उल्हासनगर, मुरबाड, शहापूर, नवी मुंबईसह ठाण्यातील वागळे इस्टेट आदी ठिकाणी विविध आस्थापनांची हजारो गोदामे कार्यरत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बहुतांशी गोदामांवर कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना केलेल्या नसल्याच्या तक्रारी जाणकार नागरिकांनी केल्या आहेत. या गोदामांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वेळीच निर्जंतुकीकरण करण्याची गरज असल्याची जाणीव करून देण्यात आली आहे. त्याची तत्काळ दखल घेऊन ठाणे जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांना फर्मान काढून या गोदामांच्या निर्जंतुकीकरणाच्या दृष्टीने खबरदारी घेण्याचे आदेश दिल्याच्या वृत्तास निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील यांनी दुजोरा दिला आहे.तहसीलदार घेणार झाडाझडतीसध्या कोरोनाची साथ मोठ्या प्रमाणात पसरत आहे. या संसर्गजन्य साथीला आळा घालण्यासाठी आधीच महापालिका, जिल्हा परिषद आणि नगर परिषदांनी लॉकडाऊन जारी केले आहेत. यासारख्या विविध उपाययोजना करून कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहे. यानुसार, अत्यावश्यक सेवा देणाºया आस्थापना व कंपन्यांच्या गोदामांमध्ये अन्नधान्यासह इतर चीजवस्तू व कच्च्या मालाचा साठा करण्यात येतो. याशिवाय, त्यात हजारो कामगारही काम करीत आहेत. त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने स्क्रिन स्कॅनिंग, पल्स आॅक्सिमीटर' म्हणजे शरीरातील आॅक्सिजन ९५ टक्केपेक्षा जास्त असणे आवश्यक असणे, सामाजिक अंतर, मास्क आदींच्या उपाययोजनांची झाडाझडती अधिकाऱ्यांकडून या गोदामांवर जाऊन केली जाणार आहे.ठरावीक वेळेनंतर येथे घ्यावी लागणार खबरदारीसंचारबंदीच्या कालावधीतही अत्यावश्यक सेवेतील कंपन्या, आस्थापना सुरूठेवण्यासाठी संधी दिलेली आहे. त्यामुळे खबरदारीची उपाययोजना म्हणून जिल्ह्यातील कार्यरत व बंद अवस्थेतील गोदामांची चाचपणी करून ते निर्जंतुकीकरण होत असल्याची खात्री करण्याचे आदेश जारी झाले आहेत.काही ठरावीक वेळेनंतर गोदामांचे दरवाजे, हॅण्डल, कडी, बेसिन्स, नळ, शौचालये, त्यांचे दरवाजे, परिसर निर्जंतुकीकरण करणे अपेक्षित आहे. कामगारांमध्ये कोविडची लक्षणे आढळून आल्यास त्वरित दवाखान्यात दाखल करून चार दिवस आस्थापना बंद ठेवून निर्जंतुकीकरण आदी सक्तीचे केले आहे.
coronavirus: कोरोनामुळे गोदामांना निर्जंतुकीकरणाची सक्ती, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2020 12:28 AM