शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
3
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
4
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
7
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
8
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
9
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
10
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
11
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
12
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
14
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
15
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
16
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
17
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
18
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
19
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
20
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"

Coronavirus: १५ प्राथमिक शिक्षकांमध्ये आढळली कोरोनाची लक्षणे; विलगीकरणाचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2021 12:18 AM

जिल्ह्यातील २६१८ शिक्षकांची अँटिजेन टेस्ट, ग्रामीण भागातील ४२२ शाळा सुरू झालेल्या आहेत. यासाठी शिक्षकांची कोरोना अँटिजेन टेस्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सुरेश लोखंडेठाणे : जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील प्राथमिक शाळेच्या दोन हजार ६१८ शिक्षकांची अँटिजेन टेस्ट केली आहे. यातून १५ शिक्षकांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आली आहेत. त्यांना विलगीकरणाचा सल्ला ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून देण्यात आला आहे, असे शिक्षणाधिकारी ललिता दहितुले यांनी ‘लोकमत’ला सांगितले. माध्यमिक शाळांमधील शिक्षकांच्या अँटिजेन टेस्टची सोय माध्यमिक शिक्षण विभागाकडेही उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले आहे.

तब्बल नऊ महिने बंद असलेल्या या पाचवी ते १२ वीच्या शाळा बुधवारपासून सुरू करण्यात आल्या आहेत. पालकमंत्री एकनाथ शिंदे व ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या आदेशास अनुसरून जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शाळा सुरू झाल्या आहेत. प्राथमिक शाळांमधील शिक्षकांच्या तपासणीप्रमाणे माध्यमिक शिक्षकांची आजच्या दुसऱ्या दिवशी माहिती उपलब्ध होणे अपेक्षित होते. पण माध्यमिक शाळांमधील शिक्षकांच्या अँटिजेन तपासणी अहवालाच्या माहितीबाबत माध्यमिक शिक्षण विभागाकडे उदासीनताच दिसून आली. विद्यापीठाच्या कामकाजाची जबाबदारी पार पडत असलेले माध्यमिक शिक्षणाधिकारी शेषराव बढे, यांनी माध्यमिकचे उपशिक्षणाधिकारी व प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळत असलेले दहितुले यांच्याकडून माहिती घेण्यास सांगितले. मात्र, दहितुले यांनीही माध्यमिक शिक्षकांच्या कोरोना अँटिजेन तपासणी अहवालाबाबत मौन बाळगले आहे.

ग्रामीण भागातील ४२२ शाळा सुरू झालेल्या आहेत. यासाठी शिक्षकांची कोरोना अँटिजेन टेस्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार प्राथमिक शाळेचे दोन हजार ६१८ शिक्षक निगेटिव्ह असल्याचे आढळून आलेले आहेत; तर तब्बल १५ शिक्षक पॉझिटिव्ह सापडले आहेत. त्यांना विलगीकरणाचा सल्ला दिल्याचे दहितुले यांनी सांगितले. या प्राथमिक विद्यार्थ्यांची काळजी घेण्यासाठी कोरोनाच्या उपाययोजना काटेकोरपणे पाळण्यात येत आहेत. त्यासाठी समग्र शिक्षण अनुदानाची रक्कम शाळांना वाटप केली आहे; तर शिक्षकांच्या प्रमाणातील ४ टक्के सादिल खर्चही वाटप होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

विद्यार्थ्यांसाठी कोरोना प्रतिबंधात्मक साहित्य खरेदी विद्यार्थ्यांची काळजी घेण्यासाठी आवश्यक असलेले कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे साहित्य खरेदी करण्यात येत आहे. यासाठी सादिल खर्चाची रक्कम शासनाने दिली आहे. ती लवकरच शाळा वाटप करण्यात येईल. याशिवाय ग्रामपंचायतींनी यासाठी मोठ्या प्रमाणात सहकार्य केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने काही कमी राहणार नाही, याची दखल घेतली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSchoolशाळा