अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिकेतील एका अधिकाºयाला तीन आठवड्यांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्याला बदलापूरमधील खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. प्रकृतीत किंचित फरक पडल्यावर त्याच्या कुटुंबीयांनी त्या अधिकाºयाला घरातच आॅक्सिजन लावण्याचा निर्णय घेतला. घरी नेल्यावर प्रकृती बिघडल्याने पुन्हा रुग्णालयात हलवण्याच्या आधीच त्यांचा मृत्यू झाला.अंबरनाथ पालिकेतील नगररचना विभागातील अधिकारी संजय कोळी यांना तीन आठवड्यांपूर्वीच कोरोनाची लागण झाली होती. पालिकेत काम करत असताना कोरोनाची लागण झालेल्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांपैकी ते एक होते. सुरुवातीला त्यांना उपचारासाठी बदलापूरच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती बिघडल्याने त्यांना त्याच रुग्णालयातील अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले. सलग २० दिवसांपासून अधिक काळ अतिदक्षता विभागात राहिल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत काही प्रमाणात सुधारणा झाली. रुग्णालयातून बाहेर पडल्यावर तब्येतीत सुधारणा होईल, या आशेवर त्यांना घरी नेण्याचा निर्णय घेण्यात आला. अर्थात, त्यांना आॅक्सिजनची गरज भासणार असल्याने घरातच आॅक्सिजनची व्यवस्थाही केली.कोळी यांना घरी आल्यावर अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना पुन्हा रुग्णालयात हलविण्याचा निर्णय कुटुंबीयांनी घेतला. मात्र, त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. कोळी यांच्या निधनाचे वृत्त पसरताच पालिका कार्यालयातही भीतीचे वातावरण निर्माणझाले आहे.
coronavirus: पालिका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू , भीतीचे वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2020 1:10 AM