अंबरनाथ: अंबरनाथ डेंटल कॉलेजमध्ये 500 बेडचे रुग्णालय उभारल्यानंतर आता त्या ठिकाणी आणखीन 300 बेड वाढविण्याचे काम पालिकेने हाती घेतले आहे. या सोबतच शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या समोर असलेल्या यूपीएससी सेंटरमध्ये तीनशे बेडचे डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले. याठिकाणी 50 बेड अतिदक्षता विभागासाठी ठेवण्यात येणार आहेत. अंबरनाथ नगरपालिकेने डेंटल कॉलेज येथे उभारलेले कोविड केअर सेंटर आणि डीसीएचसी यशस्वी झाल्यानंतर आता पालिकेने गंभीर होणाऱ्या रुग्णांना देखील शहरातच उपचार मिळावा यासाठी तीनशे बेडचे डेडिकेटेड हॉस्पिटल उभारण्याचे काम हाती घेतले आहे.या रुग्णालयात रुग्णांवर खाजगी रुग्णालयाच्या धर्तीवर उपचार केले जाणार आहे यासोबतच 50 भेटते अतिदक्षता विभाग देखील तयार करण्यात येणार आहे. शहरातील वाढती करण्याची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी हे रुग्णालय महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. या संदर्भातली पाहणी करण्यासाठी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे अंबरनाथ मध्ये आले होते त्यांनी डेंटल कॉलेजमधील वाढीव 300 बेडच्या कामाची पाहणी केली सोबतच यूपीएससी सेंटरमधील कक्षाची देखील पाहणी करून अधिकाऱ्यांना कामाचे नियोजन दिले.शहरातील गरजू आणि गरीब नागरिकांना खाजगी रुग्णालयात आयसीयू उपलब्ध होत नसल्याने अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहे ही परिस्थिती बदलण्यासाठी पालिकेने स्वतः आयसीयू कक्ष उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या कक्षाचे काम त्वरित सुरू करून ते चालवण्यासाठी संस्थेची नेमणूक करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत रसाळ यांनी स्पष्ट केले. सिटी हॉस्पिटलला भेट सद्यस्थितीत अंबरनाथ शहरामध्ये कोरोना रुग्णांसाठी अतिदक्षता विभागाची सोय नसल्याने गंभीर रुग्णांना अन्यत्र हलवावे लागत असल्यामुळे शहरातील खाजगी डॉक्टरांनी एकत्र येऊन सुरू करत असलेल्या सिटी हॉस्पिटलला खासदार यांनी भेट देऊन पाहणी केली. या ठिकाणी एकूण 70 खाटांचे नियोजन करण्यात आले असून त्यापैकी 25 खाटा अतिदक्षता विभागासाठी असतील.
CoronaVirus: यूपीएससी सेंटरमध्ये तीनशे बेडचे डेडिकेटेड कोरोना हॉस्पिटल; 50 बेडचा अतिदक्षता कक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2020 7:49 PM