शहरं
Join us  
Trending Stories
1
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
2
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
3
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
4
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
5
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
6
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
7
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
8
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
9
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
10
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
11
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
12
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
13
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
14
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
15
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
16
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
17
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
18
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
19
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
20
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत

coronavirus : तीन वर्षांच्या चिमुकलीने कोरोनाला हरवले, तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्याने दोन जणांना घरी सोडले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2020 11:40 AM

कोरोना विषाणूचे संसर्ग झालेले रुग्ण असलेल्या परिसरात वैद्यकीय अधिकारी यांचे नियंत्रणाखाली आरोग्य पथके स्थापन करून कंन्टेनमेंट प्लॅन प्रमाणे कारवाई करण्यात आली. सदर भागामध्ये १४ दिवस सर्वेक्षण करण्यात येत आहे. 

कल्याण-  सध्या जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने राज्यात अनेक प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत. कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोना आजाराच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका नागरी आरोग्य केंद्रामार्फत विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत.महापालिका क्षेत्रात अद्यापपर्यन्त कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव झालेले एकूण ५ रुग्ण आढळून आले आहेत. त्या सर्वांना कस्तुरबा रुग्णालय, मुंबई येथे दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. दाखल रुग्णापैकी २ रुग्णाची तपासणीमध्ये अहवाल निगेटिव्ह आल्याने घरी सोडण्यात आले, त्यामध्ये कल्याण मधील ३ वर्षीय बालिकेचा समावेश आहें.कोरोना विषाणूचे संसर्ग झालेले रुग्ण असलेल्या परिसरात वैद्यकीय अधिकारी यांचे नियंत्रणाखाली आरोग्य पथके स्थापन करून कंन्टेनमेंट प्लॅन प्रमाणे कारवाई करण्यात आली. सदर भागामध्ये १४ दिवस सर्वेक्षण करण्यात येत आहे. प्रत्येक नागरी आरोग्य केंद्रात आरोग्य पथके स्थापन केली असून त्यात पोलीस कर्मचारी नियुक्त केलेले आहेत. सदर पथक परदेश्यातून आलेल्या नागरिकांना भेटी देउन  त्यांच्या स्वतः च्या  घरी अलगिकरणात राहण्याचा सल्ला देत आहेत. यामध्ये सहकार्य न करणाऱ्या नागरिकांवर साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 अन्वये गुन्हा दाखल करण्यात येईल. कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात परदेश्यातून परत आलेल्या   नागरिकांना अलगिकरणात राहण्याच्या सल्ला दिलेला आहे. त्यांना नागरी आरोग्य केंद्रामार्फत भेटी देऊन दिलेल्या सूचनां ते पाळत असल्याची खातरजमा केली जात आहे. दि.२२/०३/२०२० पासून अशा नागरिकांच्या डाव्या हाताच्या पंज्यावर मागील बाजूस शिक्का मारून त्यांनी किती तारखेपर्यंत अलगिकरणात राहायचे आहे हे नमूद केलेले आहे.महापालिकेच्या वसंत व्हली, मोजे गंधारे,कल्याण (प) येथे क्वारंटाईन वॉर्डमध्ये ९ परदेश्यातून आलेल्या नागरिकांना वेगळे ठेवण्यात आले असून त्यांची सर्व व्यवस्था महापालिकेमार्फत  करण्यात येत आहे. महापालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी महापालिका क्षेत्रातील खाजगी रुग्णालयाना विलगीकरण कक्ष तयार करून व्हेंटिलेटरसहित सुसज्ज ठेवण्याचे  आदेश दिलेले आहेत.50 खा टाच्या  रुग्णालयात 10 खा टा चा विलगिकर ण  कक्ष स्थापन करणेबाबत निर्देशित केले आहे.कल्याण  डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात मध्य रेल्वेच्या रुग्णालयात १२  खाटांचे व महापालिकेच्या बाई रुक्मिणी बाई रुग्णालय आणि शास्त्रीनगर रुग्णालय येथे प्रत्येकी ५ खाटांचे विलगीकरण कक्ष तयार आहे.  महापालिकेच्या रुग्णालय व दवाखाने येथे IMA ,NIMA आणि कल्याण पूर्व मेडिकल आसोशिएशन यांचे मार्फत ७५ खाजगी वैद्यकीय व्यावसायिक सेवा देण्यास तयार आहे.त्यापैकी काही ओ पी डी साठी सेवा देत आहेत. महापालिकेतर्फे कोरोना आजाराचा मुकाबला करण्यासाठी  वॉर रूम स्थापन करण्यात आली असून या वॉर रूम मार्फत(संपर्क क्र.०२५१  २२११३७३)सर्व विभागाच्या समन्वयातून आपत्ती व्यवस्थापनाची कार्यवाही करण्यात येईल.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसkalyanकल्याण