ठाणे - कोरोनाच्या संभाव्य तिस:या लाटेचा धोका टास्फ फोर्सने देखील वर्तविला आहे. त्यात मागील काही दिवसापासून कोरोना रुग्णांची संख्या वाढतांना दिसत आहे. त्यामुळे निश्चितच ही चिंतेचा बाब आहे. परंतु नागरीकांनी राज्य शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे अन्यथा पुन्हा नाईलाजास्तव कडक र्निबध घालावे लागतील असा इशारा नगरविकासमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला.
ठाण्यात संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या वतीने उभारण्यात आलेल्या ऑक्सीजन प्लानटचे लोकार्पण ऑनलाईन पध्दतीने मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलतांना शिंदे यांनी हा इशारा दिला आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुस:या लाटेने अधिक चिंता वाढविली होती. त्यावेळेस ऑक्सीजन आणि रेमडिसवरचा तुटवडा जाणवला होता. परंतु राज्य सरकाराने केलेल्या कामामुळे आणि नागरीकांनी घेतलेल्या काळजीमुळे ही लाट थोपविता आलेली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. याच कालावधीत विविध महापालिका हद्दीत एक ते दोन ऑक्सीजनचे प्लान्ट देखील उभारण्यात आले आहेत. त्यासाठी राज्य शासन आणि एमएमआरडीएच्या माध्यमातून देखील निधी देण्यात आला आहे. परंतु आता तिस:या लाटेचा धोका वर्तविण्यात आलेला आहे.
टास्क फोर्सने देखील या विषयी सर्तकर्तेच्या सुचना दिल्या आहेत. त्यामुळे नागरीकांनी काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. मागील १५ ऑगस्ट पासून ठाण्यासह इतर भागात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होतांना दिसत आहे. त्यामुळे निश्चितच ही चिंतेची बाब म्हणावी लागणार आहे, त्यादृष्टीने राज्य शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणो गरजेचे असल्याचे मतही शिंदे यांनी यावेळी व्यक्त केले आहे. अन्यथा पुन्हा कडक र्निबध लावण्याशिवाय पर्याय शिल्लक राहणार नसल्याचा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.