शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
5
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
6
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
7
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
8
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
9
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
10
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
11
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

Coronavirus: लढा कोरोनाशी! भिवंडीमध्ये अ‍ॅक्शन प्लान तयार; दररोज होणार ३०० मोफत चाचण्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2020 12:51 AM

नागरिकांना हलका ताप व कोविडची लक्षणे जाणवल्यास त्वरित मनपाच्या फिव्हर क्लिनिक अथवा कोविड तपासणी केंद्रात यावे, असे आवाहनही डॉ. आसिया यांनी केले.

भिवंडी : भिवंडीत कोरोनाने थैमान घातले असून रुग्णसंख्येत दररोज वाढ होत आहे. यावर भिवंडी महापालिकेचे आयुक्त डॉ. पंकज आसिया यांनी कोरोनाच्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवण्यासाठी अ‍ॅक्शन प्लान तयार केला असून काही दिवसांपासून त्याची सुरूही झाली. याअंतर्गत आता दररोज ३०० मोफत चाचण्या करण्यात येणार असून आठवडाभरात दोन हजार बेडची व्यवस्था करण्यात येणार आहे.

शहरात अ‍ॅम्ब्युलन्स, वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची कमतरता भासत असताना आयुक्तांनी सुरुवातीलाच प्रभागनिहाय वैद्यकीय अधिकारी अ‍ॅम्ब्युलन्स व अ‍ॅम्ब्युलन्सचालक उपलब्ध करून दिले आहेत. तसेच ५० ते १५० पर्यंत होणाºया चाचण्यांचे प्रमाण दुप्पट होणार आहे. खासगी लॅबकडून कोविड तपासणीसाठी सुरू असलेल्या आर्थिक पिळवणुकीलाही चाप बसणार आहे. तसेच आर्थिक पिळवणूक करणाºया खासगी रुग्णालयांसह लॅबवर कारवाई करण्याचा इशारा आयुक्त डॉ. आसिया यांनी दिला आहे.

शहरातील रईस हायस्कूल येथे ४०० बेडचे कोविड सेंटर मंगळवारपासून सुरू करण्यात येणार आहे. याच ठिकाणी कोविडची मोफत तपासणी होणार आहे. तसेच शहरातील चाचा नेहरू हायस्कूलमध्ये १५० बेडचे कोविड केंद्र , खुदाबक्ष हॉल येथे १२० बेडचे आणि ओसवाल हॉल येथे १०० बेडचे कोविड केंद्र आठवडाभरात सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त डॉ. आसिया यांनी सोमवारी दिली.ताप येत असल्यास उपचार घ्या!नागरिकांना हलका ताप व कोविडची लक्षणे जाणवल्यास त्वरित मनपाच्या फिव्हर क्लिनिक अथवा कोविड तपासणी केंद्रात यावे, असे आवाहनही डॉ. आसिया यांनी केले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या