शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
3
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
4
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
5
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
6
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
7
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
8
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
9
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
10
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
12
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
13
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
14
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
15
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
16
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
17
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
18
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
19
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
20
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार

Coronavirus: अंबरनाथमध्ये पाच हजार कोविड चाचण्या मोफत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2020 2:46 AM

शहरात अनेक खाजगी लॅब जास्त दर आकारून नागरिकांच्या चाचण्या करत आहेत. त्यामुळे पालिकेनेच आता लॅबला परवानगी दिल्याने नागरिकांची गैरसोय होणार नाही.

अंबरनाथ : अंबरनाथ पालिका क्षेत्रात एका लॅबला कोविड टेस्ट करण्याची मुभा दिली आहे. मात्र त्या मोबल्यात अंबरनाथ पालिकेने सुचविलेल्या ५ हजार रुग्णांच्या चाचण्या मोफत कराव्या लागणार आहे. या लॅबचा अहवाल २४ तासात येत असल्याने त्याचा फायदा गंभीर रुणांच्या चाचणीसाठी होणार आहे.

अंबरनाथ पालिकेने पूर्व भागातील वडवली शाळेत कोविड चाचणी केंद्र उभारण्यास परवानगी दिली आहे. या सेंटरमध्ये लवकर अहवाल येत असल्याने ज्यांची प्रकृती खराब आहे त्यांची चाचणी लागलीच करून त्याचा अहवाल आल्यावर त्यांच्यावर वेळेवर उपचार करणे सोपे जाणार आहे.

शहरात अनेक खाजगी लॅब जास्त दर आकारून नागरिकांच्या चाचण्या करत आहेत. त्यामुळे पालिकेनेच आता लॅबला परवानगी दिल्याने नागरिकांची गैरसोय होणार नाही. शहरातील डॉक्टरांकडे उपचारासाठी जाणाऱ्यांनाही चाचण्या बंधनकारक असल्याने इतर रुग्णालाही या लॅबची मदत होणार आहे. परवानगी देत असताना अंबरनाथ पालिकेने सुचविलेल्या नागरिकांना मोफत चाचण्या करून देणे बंधनकारक केले आहे. पालिकेच्या या निर्णयाचे अंबरनाथमधील नागरिकांनी स्वागत केले आहे.पालिकेचे रिपोर्ट येण्यासाठी तीन दिवस लागतात. त्या दरम्यान एखाद्या रुग्णाला उपचाराची गरज असल्यास त्याला वेळेवर उपचार मिळत नसल्याची तक्रार होती. त्यामुळे जलद गतीने रिपोर्ट देणाऱ्यांना परवानगी देण्यात आली आहे. - डॉ. प्रशांत रसाळ, मुख्याधिकारी

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस