ठाणे: ठाणे जिल्ह्यात रविवारी ही चार जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 29 झाली आहे. आजच्या अहवालात मीरा-भाईंदरसह केडीएमसीमध्ये प्रत्येकी एक तर ठामपा कार्यक्षेत्रात दोन कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. तसेच मीरा-भाईंदरमध्ये पहिला रुग्ण आढळून आला आहे. तर, जिल्ह्यात सर्वाधिक पॉझिटिव्ह दहा रुग्ण हे ठामपा कार्यक्षेत्रातील आहेत. त्यापाठोपाठ केडीएमसी आणि नवीमुंबई प्रत्येकी 8, उल्हासनगर, ठाणे ग्रामीण आणि मीरा-भाईंदर येथे प्रत्येकी एक अशाप्रकारे एकूण 29 रुग्णांचा समावेश आहे. लॉकडाऊन कालावधीत जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे.
CoronaVirus in Thane ठाणे जिल्ह्यात आणखी चार जण पॉझिटिव्ह ; कोरोनाग्रस्तांची संख्या 29
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2020 9:23 PM