शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
2
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
3
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
4
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
5
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
6
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
7
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
8
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
9
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
11
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
12
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
13
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
14
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
15
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
16
'पथेर पांचाली'मधील 'दुर्गा' काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचं निधन
17
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
18
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
19
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
20
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल

coronavirus : जंगलात अडकलेल्या परप्रांतीयांची आठ तासांच्या थरारानंतर सुटका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2020 5:28 PM

व्यवस्थापनाने गोडावून बंद असल्यामुळे हाकलवुन लावल्याने पायी पायी आपल्या प्रांतात निघालेले 4 मजूर  कसारा घाटातील उंट दरीत अडकले होते

- शाम धुमाळकसारा  - भिवंडी ( वडपा )येथील एका  गोडावूनमध्ये कामाला असणाऱ्या कामगारांना तेथील व्यवस्थापनाने गोडावून बंद असल्यामुळे हाकलवुन लावल्याने पायी पायी आपल्या प्रांतात निघालेले 4 मजूर  कसारा घाटातील उंट दरीत अडकल्याने त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रशासनास तब्बल 8 तास अथक परिश्रम करावे लागले.   लोकडाऊन मुळे अनेक परप्रांतीय मजूर  मुबंई, ठाणे, कल्याण सह विविध ठिकाणाहून पायी पायी आपल्या प्रांतात निघाले आहेत अनेक मजुरांची शासनाने सोय केल्यानंतर देखील ह्या मजुरांना त्यांचे घरमालक, कंपनी ठेकेदार, यांनी हाकलल्यामुळे दररोज शेकडो लोक पायी जात आहेत. रस्त्यावर पोलीस असल्याने काही जण डोंगर, दरीतून पायवाट काढत प्रवास करीत आहेत. असाच प्रवास भिवंडी तील गोडावून ला कामाला असणारे 1)नरेंद्र चौधरी  2)भूपाल निसार 3)राजेश कोल 4)फुलचंद रावत. हे मजूर पायी प्रवास करीत असताना त्यांनी महामार्गावर लतिफ़वाडी व कसारा घाट माथ्यावर पोलीसांचे चेक पोस्ट असल्याने त्यांनी मुंबई नाशिक महामार्ग वरील चिंतामण वाडी येथून डोंगरी मार्ग अवलंबला 12/13 किलो मीटर चालल्या नंतर ते दुपारी 3 च्या सुमारास उंट दरीच्या जंगलात भरकटले 1600 फूट खोल व घनदाट झाडी असलेल्या दरीतून वाट काढण्याच्या प्रयत्नात रात्र झाली पण काही रस्ता भेटत नसल्याने अडकल्या पैकी एकाने 100 नंबर वर फोन करून पोलीसांकडे मदत मागितली तेव्हा रात्रीचे 11 वाजले होते त्यानंतर कसारा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दत्तू भोये, psi महाले, psi खतीब व  पोलिस कर्मचारी व आपत्ती व्यवस्थापन टिम शहापूर या व्हाट्सअप ग्रुप सदस्यांनी  विविध डोंगर कठडे व  परिसरात शोध घेतला पण मिळून येत नसल्याने त्यांचे मोबाईल ट्रॅक करून लोकेशन काढले असता ते उंटदरीत अडकल्याचा अंदाज व्यक्त केला. अडकलेल्या पैकी एकाशी मोबाईल वर संभाषण सुरु होते साहेब हमे बचाव असा ओरडा करत होते कसारा घाट घाटनदेवी मंदिरा समोरील एका टेकडी वरून दरीत मोबाईल लाईट दिसली या नंतर पोलीस कर्मचारी रामदास राठोड  व आपत्ती व्यवस्थापन टिम मधील लक्ष्मण वाघ  काही सदस्य सावरवाडी (कसारा खुर्द )येथून उतरले तर कसारा घाट घाटनदेवी मंदिराकडून काही लोक मदतीला उतरले व  8 तासा नंतर ते मिळून आले. मदतीला असणारी टिम 1600 फूट खोल दरी चढ उतार करीत अडकलेल्या लोकांना वर आणल्या नंतर त्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.  या मोहिमेत आपत्ती व्यवस्थापन टिम चे  शाम धुमाळ, दत्ता वाताडे, अक्षय राठोड, प्रथमेश पुरोहित, रवी देहाडे बबन जाधव स्वप्नील कलंत्री , मयूर गुप्ता व पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसbhiwandiभिवंडीMaharashtraमहाराष्ट्र