ठाणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जग झपाट्याने बदलत असताना तंत्रज्ञानाभिमुख भूमिका घेणे हेच उचित ठरेल. तसेच कुठल्याही कंपनीतील एचआर (मानव संसाधन अधिकारी) हाच खरा संकटमोचक असतो. कारण सर्वात कठीण काळात कंपन्या आणि त्यांचे कर्मचारी यांच्या पाठीशी उभे राहण्याची मोठी जबाबदारी त्यांच्यावर असते, असे प्रतिपादन ईएसडीएस सॉफ्टवेअर सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेडचे ग्रुप सीएचआरओ डॉ. चंद्रमौली द्विवेदी यांनी बुधवारी केले.मुंबई आणि पुणे संघाच्या संयुक्त अध्यक्षांनी साथीच्या आजाराशी संबंधित समस्या सोडवण्यासाठी वेबिनारचे आयोजन केले होते. मुंबईचे विभागाचे अध्यक्ष विनू पिल्लई आणि पुणे विभागाचे अध्यक्ष अभिजित पुरी यांनी विविध आयटी आणि आयटीएस कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना वेबिनारमध्ये आमंत्रित केले होते.एचआर इन्फोटेक असोसिएशनच्या वतीने आयआर व आयटीएस उद्योगांना मानव संसाधना संबंधित समस्या सोडविण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या २५ व्या वर्षानिमित्त हे आयोजन केले होते. सध्याच्या लॉकडाउनमुळे सर्व व्यावसायिकांपुढील संकटे वाढली आहेत. मात्र संघाला आपले कौशल्य दाखवण्याची व व्यावसायिकांपुढील संकटांचे निराकरण करण्याची हीच वेळ आहे, असे संघाच्या अध्यक्षांनी नमूद केले.‘ईएसडीएस सॉफ्टवेअर सोल्युशन्स’चे ग्रुप सीएचआरओ डॉ. चंद्रमौली द्विवेदी हे वेबिनारचे अध्यक्ष होते. हॅशटसी डिजिटलचे अध्यक्ष व मार्गदर्शक हनुमान त्रिपाठी, क्युओलॉजिक टेक्नोलॉजीजचे सीसीओ नील वर्टीकर, पर्सिस्टंट सिस्टमचे सीटीओ पांडुरंग कामत आणि सिटीसटेक हेल्थकेअर टेक्नॉलॉजीचे मुख्य वित्तीय अधिकारी प्रशांत महागावकर यांनी यावेळी मते मांडली. (वा. प्र.)
coronavirus: ‘एचआर’ हाच संकटमोचक - द्विवेदी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2020 12:18 AM