शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
तेलंगणा सरकारने अदानी समूहाची १०० कोटींची देणगी नाकारली, कारण...
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
4
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
5
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
6
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
7
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
8
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
9
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
10
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
11
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
12
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
13
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
14
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
15
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
16
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
17
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
18
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
19
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
20
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."

CoronaVirus : उच्चभ्रू वस्तीत कोरोनाची लक्षणे लपवण्याच्या वृत्तीमुळे संसर्ग वाढतोय...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2020 4:47 PM

ठाणे शहरात लॉकडाऊन सुरु असताना देखील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या काही गृहनिर्माण संस्था मध्ये नेहेमीसारखे दैनंदिन व्यवहार सुरूच असल्याची गंभीर बाब अनेकदा पुढे आली होती.

ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण  ८९ टक्क्यांवर आले असून शहरात फक्त दहा टक्केच रुग्ण उरले असल्याचा महापालिकेचा दावा आहे. ठाणे  शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या व्यापक  चाचण्यांना प्राधान्य देण्यात येत असल्याने त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. असे असले तरी ठाणे शहरात अजून देखील मोठ मोठ्या गृहनिर्माण संस्था मधून राहणाऱ्या सुशिक्षित ठाणेकर नागरिकांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळल्यानंतर ती लपवण्याकडे कल वाढत चालला आहे. यामुळे संसर्गाची व्याप्ती पुन्हा वाढण्याची शक्यता असून शहरात महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेच्या मेहेनतीवर पाणी फिरणार आहे. 

मागील काही दिवसात ठाणे शहरात कोरोनाने दाटीवाटीच्या चाळी, झोपडपट्ट्या सोडून गृहनिर्माण संस्थेमध्ये शिरकाव केला असून त्या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांमध्ये कोरोनाचा  संसर्ग वाढत चालला असल्याचे दिसून येत आहे. मात्र जनलज्जे पोटी काही जण आपल्याला जाणवत असलेली लक्षणे लपवून चाचणी करण्यास नकार देत आहेत. कोरोना पॉझिटिव्ह आहे, समजल्यानंतर त्या कुटुंबावर अघोषित बहिष्कार टाकला जात असल्याने अनेक जण चाचणीस नकार देत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे.

ठाणे शहरात लॉकडाऊन सुरु असताना देखील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या काही गृहनिर्माण संस्था मध्ये नेहेमीसारखे दैनंदिन व्यवहार सुरूच असल्याची गंभीर बाब अनेकदा पुढे आली होती. लॉकडाऊन काळात घराच्या टेरेसवर पार्ट्या करणे, मोकळ्या जागेत क्रिकेट खेळणे, बंदी असताना देखील मॉर्निंगवॉकला जाणे असे अनेक प्रकार या ठिकाणी सुरूच असल्याचे पाहायला मिळत होते. तक्रारी नंतर अनेक ठिकाणी पोलिसांनी हस्तक्षेप करून गुन्हे देखील दाखल केले आहेत. शहर टप्प्याटप्प्यात अनलॉक झाल्या नंतर याच परिसरात वर्दळ वाढल्याचे दिसून येते. विविध कारणामुळे अथवा व्यावसायिक कारणामुळे घरातून बाहेर पडण्याचे प्रमाण याच परिसरातून अधिक असल्याने या ठिकाणी बाधितांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. 

आपणास कोरोना झाला तर सोसायटीतील इतर सभासदांचा आपल्या कुटुंबांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलू शकतो, अथवा आपल्या नातेवाइकांना ही गोष्ट समजली तर त्यांना काय वाटेल, ही भावना कोरोनाची   लक्षणे लपवण्यामागे आढळून  येत आहे. विशेष करून सुशिक्षित युवकांमध्ये घरीच राहून सोशल मीडियावरून सल्ले देणारी औषधे किंवा घरच्या घरी राहून करता येणाऱ्या उपाययोजना अंमलात आणून उपचार करण्याची मानसिकता वाढत चालली आहे. त्याच प्रमाणे सौम्य लक्षणे आढळून आल्या नंतर महापालिका  रुग्णांना घरच्या घरी विलगीकरणात राहून उपचार करण्यास परवानगी देते. परंतु अशा रुग्णांना घराबाहेर पडण्यास मनाई असताना देखील काही जण नियमांची पर्वा न करता घरच्या बाहेर पडत असल्याने गृहनिर्माण संस्था मधील इतर सदस्यांना असलेला धोका वाढत चालला आहे.   

दुकानदारांचा देखील चाचणी न करण्याकडे कल... अनेक प्रभाग समितीमध्ये प्रभागातील दुकानदारांची रॅपिड अॅक्शन टेस्ट करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु असले, तरी काही दुकानदार मात्र अजून देखील टेस्ट करून घेण्यास तयार नसल्याचे दिसून येत आहे. अनेकांनी महापालिकेच्या रॅपिड अॅक्शन टेस्टवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करून जास्तीत जास्त दुकानदारांना पॉझिटिव्ह ठरवून दुकाने बंद ठेवण्याचा पालिकेचा डाव असल्याचा अफवा, यामागे असल्याचे सांगितले जात आहे. तर अनेकांनी पालिकेने टेस्ट करण्याची मोहीम सुरु केल्यापासून आपली दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे