शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
2
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
3
“नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
4
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट
5
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंनी जाहीरच करून टाकलं
6
"...अन्यथा तुम्हाला सरकारी नोकरी गमवावी लागेल", मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
7
'लव्ह अँड वॉर'च्या सेटवरुन Photos लीक, रेट्रो लूकमध्ये दिसली आलिया तर रणबीरचा डॅशिंग अवतार
8
Baba Siddique : "मारेकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यासाठी मिळाले ५० हजार"; आरोपीने दिली महत्त्वाची माहिती
9
शिंदे उद्या दिल्लीला जाणार! भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचीही बैठक होणार
10
"सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ ही ओळख मोठी"; एकनाथ शिंदेंचं CM पदाबाबत सूचक विधान
11
"नाराज होऊन आम्ही रडणारे नाही", एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडण्याचे संकेत 
12
एकनाथ शिंदेंनंतर लगेचच भाजपही पत्रकार परिषद घेणार; काय घडतेय...
13
अमित शाह यांच्या दालनात शिवसेनेच्या खासदारांना जमण्याच्या सूचना; श्रीकांत शिंदे अनुपस्थित राहणार?
14
मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
15
Defence Stock: डिफेन्स स्टॉक्स पुन्हा एकदा सुस्साट, एक्सपर्ट बुलिश; पाहा काय आहेत नवी टार्गेट प्राईज
16
सत्तेत असावे की, सत्तेबाहेर? बच्चू कडूंनी जनतेलाच विचारला सवाल
17
ICC Test Rankings: जसप्रीत बुमराह पुन्हा 'नंबर १'! यशस्वी जैस्वाल, विराट कोहलीचीही कसोटी यादीत मोठी झेप
18
शेजाऱ्याने मुलाला केलं किडनॅप, नंतर शोधण्याचं नाटक; खंडणी न मिळताच भयंकर कृत्य अन्...
19
विरोधकांना EVMवर संशय, कोर्टात जायची तयारी; भाजपा नेतृत्वाचे भाष्य, म्हणाले, “लोकसभेवेळी...”
20
भाजपच्या मंत्र्यानं अजान ऐकून थांबवलं भाषण; मंचावरूनच पठण केलं, ‘ला इलाहा इल्लल्लाह…’ 

Coronavirus in Kalyan: कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचे २७ नवे रुग्ण; एकूण रुग्णसंख्या २८०

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2020 2:49 AM

नव्या रुग्णांमध्ये वैद्यकीय कर्मचारी, पोलीस

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत शुक्रवारी कोरोनाची लागण झालेले २७ नवे रुग्ण आढळले आहेत. नव्या रुग्णांमध्ये डोंबिवलीतील वैद्यकीय कर्मचाऱ्यांसह पोलिसाचा समावेश आहे. या रुग्णांसह महापालिका हद्दीतील एकूण रुग्णांची संख्या २८० झाली आहे.

डोंबिवली पूर्वेतील ६९ वर्षीय वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तीला, तसेच कल्याण पूर्व व पश्चिमेतील दोन आणि डोंबिवली पूर्व पश्चिमेतील दोन वैद्यकीय महिला कर्मचाऱ्यांना लागण झाली आहे. यापैकी तीन महिला मुंबईतील सरकारी रुग्णालयातील, एक ठाण्यातील खाजगी रुग्णालयात काम करते. कल्याण पूर्वेतील तीन सरकारी कर्मचारीही कोरोनाबाधित आढळले, तर दोन पोलिसांनाही कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी एक पोलीस हा कल्याण पश्चिमेत तर दुसरा कल्याण पूर्वेत राहतो. वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीत कर्तव्यावर असलेला पोलीस कर्मचारीही कोरोनाबाधित झाला आहे. कल्याण पूर्वेतील सरकारी सेवेतील सुरक्षारक्षकालाही कोरोना झाला आहे. डोंबिवली पश्चिमेतील महिला लॅब टेक्निशियन, तसेच गुजरात येथील खाजगी कंपनीत काम करणारा आणि डोंबिवलीत राहणाºया व्यक्तीलाही कोरोना झाला आहे. कल्याण पश्चिमेतील महिला फार्मासिस्ट, पूर्वेतील वाशी येथे काम करणारा कर्मचारी, डोंबिवली पश्चिमेतील कृषी उत्पन्न बाजार समितीतील कर्मचारी कर्मचारी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. डोंबिवली पूर्वेतील रुग्णाच्या संपर्कात आलेल्या आणखी एकाला लागण झाली आहे.कल्याण पश्चिमेतील चार जणांना कोरोनाबाधितांच्या संपर्कातून संसर्ग झाला आहे. कल्याण पश्चिमेतील दोन विद्यार्थ्यानाही कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांच्याबाबतचा पूर्वेतिहास महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे नाही.२० रुग्ण पालिका हद्दीबाहेर काम करणारेनव्या आढळून आलेल्या २७ रुग्णांपैकी २० जण हे मुंबई, ठाणे, वाशी याठिकाणी काम करणारे आहेत. एक रुग्ण हा गुजरात येथून आलेला आहे. शहरातील केवळ सातच रुग्ण आहेत. आतापर्यंत आढळून आलेल्या एकूण रुग्णांपैकी ७६ रुग्णांना उपचारांनंतर घरी सोडण्यात आले आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या २०० आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस