कल्याण : कल्याणडोंबिवली महापालिका हद्दीत कोरोनाचे 18 नवे रुग्ण आढळून आले आहेत. नव्याने आढळून आलेल्या रुग्णांच्या संख्येमुळे कोरोना ग्रस्तांच्या आकेडवारीने डबल सेंच्यूरी पार केली आहे. एकूण रुग्णांची संख्या 213 झाली आहे.
कोरोना रुग्णाच्या सहवात आल्याने डोंबिवली पूव्रेतील 72 वर्षीय महिला, 23 वर्षीय तरुणी, 25 वर्षीय तरुण, 20 वर्षीय तरुणी, 46 वर्षीय महिला, मांडा टिटवाळ्य़ातील 21 वर्षीय तरुण, 26 वर्षीय तरुणी, 58 वर्षीय गृहस्थ, कल्याण पश्चिमेतील 42 वर्षीय इसम, कल्याण पूव्रेतील 33 वर्षीय महिला यांना कोरोनाची लागण झाली आहे.कल्याण पूव्रेतील 42 वर्षीय पोलिसाला कोरोना झाला आहे. तो वाशी येथे कार्यरत आहे. मुंबईत कार्यरत असलेल्या 35 वर्षीय पोलिसाला कोरोना झाला आहे. तो कल्याण पश्चिमेत राहतो. मोहने परिसरात राहणा:या महिला पोलिसालाही कोराना झाला आहे. तिचे वय 29 वर्षे आहे. मांडा टिटवाळ्य़ात राहणा:य 38 वर्षे पोलिसाला कोरोनाची बाधा झाली आहे.
वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीत कार्यरत असलेल्या 36 वर्षीय कामगाराला कोरोना झाला. तो डोंबिवली पश्चिमेला राहतो. भिवंडीतील फार्मा कंपनीत कार्यरत असलेल्या 34 वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण झाली आहे. तो कल्याण पश्चिमेला राहतो. मुंबई सरकारी रुग्णलयात काम करणा:या आरोग्य विभागातील दोन कामगारांना कोरोना झाला आहे. त्यापैकी 33 वर्षीय पुरुष हा डोंबिवली पश्चिमेला तर दुसर 38 वर्षीय पुरुष हा कल्याण पूर्वेत राहतो.कोरोना बाधित रुग्णांपैकी उपचार घेऊन बरे झालेल्या 68 जणांना घरी सोडण्यात आले आहे. 124 कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत.